करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी गझलेचा सन्मान; मॉरिशसमधील साहित्य संमेलनात बापू दासरी अध्यक्ष

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी गझलेचा सन्मान; मॉरिशसमधील साहित्य संमेलनात बापू दासरी अध्यक्ष

करियर
नांदेड | मॉरिशस येथे होणाऱ्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनातील गझल मुशायरा व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे ज्येष्ठ कवी व गझलकार बापू दासरी यांची निवड करण्यात आली आहे. आयोजकांनी नुकतीच ही घोषणा केली असून, त्यांच्या निवडीमुळे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दशकांपासून मराठी गझल चळवळीत सक्रिय असलेल्या बापू दासरी यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक काव्यमैफिली, शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि गझल मुशायऱ्यांचे प्रभावी सूत्रसंचालन केले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय साहित्यिक व्यासपीठावर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नांदेड येथे गेल्या अकरा वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा असून ते या समितीचे अध्यक्ष आहेत. त...
शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना सदिच्छा भेटी

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना सदिच्छा भेटी

करियर
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची विष्णुपुरी जि.प. हायस्कूलला भेट; विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत नांदेड | महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळा परिसरात आनंद, उत्साह आणि स्वागताचा माहोल पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने जिल्हाभरातील विविध शाळांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शुभेच्छा आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णुपुरी येथे भेट देऊन नवागत ...
श्वेता सीताराम कांबळे एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण; कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव

श्वेता सीताराम कांबळे एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण; कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव

करियर
हिमायतनगर | श्वेता सीताराम कांबळे हिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत एमबीबीएस (MBBS) पदवी पूर्ण केली आहे. तिने विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेत परीक्षा दिली होती. या परीक्षेत यश मिळवत तिने एमबीबीएस पदवी संपादन केली आहे. श्वेताच्या या यशाबद्दल हिमायतनगरचे पत्रकार शुद्धोधन हनवते, मामा प्रवीण हनवते, मामी तेजस्वी हनवते, वैशाली हनवते तसेच प्रणव कांबळे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेताचे वडील सामान्य शिक्षक पदावर कार्यरत असून आपल्या दोन्ही मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावे, असे त्यांचे स्वप्न होते. मुलीच्या रूपाने हे स्वप्न साकार झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आता मुलालाही वैद्यकीय क्षेत्रात पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत ...
मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड

मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड

करियर
नांदेड | मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती संमेलनाच्या आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी दिली. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात संमेलन पार पडणार आहे. या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन यांसारखे विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी साहित्यविश्वातील मान्यवरांसह रसिकांसाठी हे संमेलन विशेष आकर्षण ठरणार आहे. मॉरिशसमधील मराठी भाषिक विद्यार्थी,...
कारला गावच्या बोंपिलवार बंधूंची शैक्षणिक भरारी; संगीत विषयात दोघांनी संपादन केली पीएच.डी. पदवी

कारला गावच्या बोंपिलवार बंधूंची शैक्षणिक भरारी; संगीत विषयात दोघांनी संपादन केली पीएच.डी. पदवी

करियर
प्रा. ज्ञानेश्वर व प्रा. नामदेव बोंपिलवार यांचे यश; कारला गावासह हिमायतनगर तालुक्याचा वाढवला गौरव हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील कारला गावातील बोंपिलवार (कार्लेकर) परिवारासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या उल्लेखनीय यशात दोन सख्ख्या बंधूंनी संगीत विषयात विद्यापीठाची पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी संपादन केली आहे. प्रा. ज्ञानेश्वर रामदास बोंपिलवार आणि प्रा. नामदेव रामदास बोंपिलवार यांनी संगीत विषयातील सखोल संशोधनाच्या जोरावर अमरावती विद्यापीठाची सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी दोन्ही प्राध्यापकांनी दीर्घकाळ सातत्यपूर्ण संशोधन कार्य केले आहे. संगीत क्षेत्रातील विविध पैलूंचा अभ्यास करून त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाची भर घातली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामुळे ...
संगमवाडीच्या पाच युवकांची भारतीय सैन्यात निवड; गावकऱ्यांकडून जंगी सत्कार

संगमवाडीच्या पाच युवकांची भारतीय सैन्यात निवड; गावकऱ्यांकडून जंगी सत्कार

करियर
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची भावना असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, याचे उत्तम उदाहरण संगमवाडी गावातील पाच युवकांनी दाखवून दिले आहे. पवन परमेश्वर घुगे, लखन परमेश्वर घुगे, ऋषिकेश मारुती घुगे, कृष्णा बाबुराव घुगे आणि शिवदास मारुती तिडके या पाच युवकांची भारतीय सैन्यात (इंडियन आर्मी) निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी युवकांच्या गौरवार्थ गावात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून या युवकांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण संगमवाडी गावाचे नाव उंचावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संगमवाडी हे गा...
डॉ. विकास सुकाळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती; पीपल्स कॉलेजमध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात

डॉ. विकास सुकाळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती; पीपल्स कॉलेजमध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात

करियर
नांदेड | परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्रहण सोहळा महाविद्यालयाच्या आयसीटी हॉलमध्ये शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. विकास सुकाळे यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर तसेच सौ. सुधा सुकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी पीपल्स कॉलेजच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्राचार्यपदी विराजमान झाल्याचे सांगितले. डॉ. विकास सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात विकासपर्व...
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

शेती, करियर
ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जूनपर्यंत मुदत नांदेड| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय, नांदेड येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 जून 2026 आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून विद्यार्थी अधिकृत प्रवेश संकेतस्थळ येथे अर्ज करू शकतात. राज्य शासनाने 18 मे 1972 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचा विद्यापीठ कार्यक्षेत्रात समावेश आहे. विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीन प्रमुख शाखांपैकी निम्नस्तर कृषि शिक्षण शाखेअंतर्गत शासक...
मराठवाड्यातून संदीप उदगीरकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड

मराठवाड्यातून संदीप उदगीरकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड

करियर
नांदेड (प्रतिनिधी) रांजणोली (ता. भिवंडी, जि. ठाणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची मराठवाडा विभागातून राज्य कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची एकमताने निवड झाली. तर मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची संचालकपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप उदगीरकर यांनी सांगितले की, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत, अन्यथा संघटनेकडून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच केंद्र व राज्य सर...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने लक्ष्मणराव भवरे यांचा गौरव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने लक्ष्मणराव भवरे यांचा गौरव

करियर
आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नाशिक येथे सन्मान; सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव नांदेड | सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शनिवारी (दि. 23 मे) देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, इंदू मिल स्मारकाचे प्रणेते व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लक्ष्मणर...
error: Content is protected !!