करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पहिल्याच प्रयत्नात गुणवंत पावडे यांची सीए परीक्षेत घवघवीत भरारी

पहिल्याच प्रयत्नात गुणवंत पावडे यांची सीए परीक्षेत घवघवीत भरारी

करियर
नांदेडच्या गुणवंताने मिळवले सनदी लेखापाल (CA) पद; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव नांदेड | नांदेड शहरातील प्रतिष्ठित उद्योजक तथा वामनराव पावडे मंगल कार्यालय आणि गंगोत्री स्वीट हॉलचे संचालक बालासाहेब किशनराव पावडे (दीपनगर) यांचे सुपुत्र गुणवंत बालासाहेब पावडे यांनी पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल (Chartered Accountant - CA) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत गुणवंत यांनी हे यश मिळवून आपल्या कुटुंबासह नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, गुरुजन आणि बहीण डॉ. गायत्री पावडे यांना दिले. गुणवंत यांनी आपले शालेय शिक्षण गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पूर्ण केले असून, त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर...
टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

करियर
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नांदेड | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका एक दिवस आधीच फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डिवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा निषेध क...
हु.ज.पा. महाविद्यालयात कृषीदिन निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

हु.ज.पा. महाविद्यालयात कृषीदिन निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

करियर
हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील (हु.ज.पा.) महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांची जयंती 'कृषीदिन' म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे होते. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी इतिहास विभागाचे प्रा. डॉ. व्ही. व्ही. कदम यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, त्यांनी कृषी विकास, जलव्यवस्थापन, ऊर्जानिर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, कामगार कल्याण आणि राज्याच्या आर्थिक विकासासाठी मोलाचे योगदान दिले. शेती क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या दूरदृष्टीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात कृषी विकासाला नवी दिशा म...
भारतीय बौद्ध महासभा, हदगाव तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

भारतीय बौद्ध महासभा, हदगाव तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

करियर
दिलीप नवसागरे तालुकाध्यक्ष; पंचशील बुद्ध विहारात निवड प्रक्रिया संपन्न हदगाव, गौतम वाठोरे | भारतीय बौद्ध महासभा, हदगाव तालुका शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. रविवार (दि. २८ जून) रोजी हदगाव येथील पंचशील बुद्ध विहार येथे झालेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड होते. जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्षपदी दिलीप तुकाराम नवसागरे, सरचिटणीसपदी संदीप बापूराव सोनुले आणि कोषाध्यक्षपदी गौतम रेखाजी काकबांडे यांची निवड करण्यात आली. याशिवाय उपाध्यक्ष (संस्कार) सोनबाराव कामाजीराव दवणे, उपाध्यक्ष (पर्यटन/प्रसार) कचरू बाणाजी वाढवे, उपाध्यक्ष (संरक्षण) बोधीपाल रामराव जमदाडे, कार्यालयीन सचिव शेषराव विठ्ठलराव कदम, हिशोब तपासणीस प्रा. राजेश कोंडबाराव राऊत, संस्कार सचिव विलास संभाज...
शाळांच्या दर्शनी भागात शुल्काचे फलक अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना

शाळांच्या दर्शनी भागात शुल्काचे फलक अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना

करियर
नांदेड | जिल्ह्यातील स्वयंअर्थसहायित इंग्रजी, मराठी व इतर माध्यमांच्या सर्व शाळांनी शाळेच्या दर्शनी भागात वर्गनिहाय शैक्षणिक शुल्काची माहिती देणारे फलक अनिवार्यपणे लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. शैक्षणिक शुल्क, गणवेश व पुस्तके खरेदीबाबत पालकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम-2011 नुसार प्रत्येक स्वयंअर्थसहायित शाळेने कार्यकारी समिती गठित करून वर्गनिहाय वार्षिक शुल्क निश्चित करावे आणि त्याची माहिती दर्शनी फलकावर प्रसिद्ध करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय बॅग, बूट किंवा पुस्तके शाळेतून अथवा विशिष्ट ...
भरमसाठ वेतन नव्हे, ज्ञानसेवेची निष्ठाच खरी संपत्ती; प्रभावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणादायी कार्य

भरमसाठ वेतन नव्हे, ज्ञानसेवेची निष्ठाच खरी संपत्ती; प्रभावती शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणादायी कार्य

करियर
नांदेड, गोविंद मुंडकर| शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाजपरिवर्तनाची अखंड साधना आहे, याची प्रचिती प्रभावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक परिसराला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान आली. आधुनिक सुविधा, प्रशस्त इमारत, पारदर्शक प्रशासन, ज्ञानदानासाठी समर्पित शिक्षकवृंद आणि अत्यल्प वेतनातही अविरत सेवा देणारे कर्मचारी यामुळे ही संस्था शिक्षणक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे स्पष्टपणे जाणवले. माध्यम प्रतिनिधींनी संस्थेला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि शिस्तबद्ध कामकाज पाहून संस्थेची गुणवत्ता अधोरेखित झाली. संस्थेच्या प्रत्येक घटकात शिक्षणाविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची बांधिलकी दिसून आली. यावेळी संस्थेचे ग्रंथपाल गणेश देशमुख यांनी अत्यंत मनोगतपूर्ण शब्दांत संस्थेची...
सिरंजनी रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे शंभर विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात

सिरंजनी रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे शंभर विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात

करियर
मानव विकास बस सेवा बंद करण्याचा इशारा; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात संताप हिमायतनगर | हिमायतनगर-आयटीया-सिरंजनी मुख्य रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक रस्त्यामुळे सिरंजनी, एकंबा, कौठा व सेलोडा येथील सुमारे १०० विद्यार्थ्यांना ने-आण करणारी मानव विकास बस सेवा बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा बस वाहतूक नियंत्रक दत्तात्रय दळवे यांनी दिला आहे. आयटीया ते सिरंजनी या मार्गावर पावसामुळे मोठे भगदाड पडले असून बसचालकाच्या सतर्कतेमुळे नुकताच मोठा अनर्थ टळला. बस खोल खड्ड्यात जाण्याच्या स्थितीत असतानाही चालकाने प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवले. मात्र, याच रस्त्यावर यापूर्वीही अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप ठोस दुरुस्ती न केल्याने नागरिकांमध्...
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचा कठोर निर्णय स्वागतार्ह – प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचा कठोर निर्णय स्वागतार्ह – प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार

करियर
नांदेड | उच्च शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कठोर निर्णय समाजहिताचे असून, विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयाची निवड करताना अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार यांनी व्यक्त केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने काही महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शिक्षणातील गुणवत्ता जपणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रा. घुंगरवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक प्रयोगशाळा, पात्र प्राध्यापक, ग्रंथालय सुविधा आणि दर्जेदार अध्यापनाचा अभाव असूनही विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. परिणामी अनेक विद्यार्थी पदवीधर होतात; मात्र त्यांच्याकडे आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि रोजगारक्षमतेचा अभाव राहतो. अश...
उन्हाचा तडाखा वाढला; नांदेड जिल्ह्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात

उन्हाचा तडाखा वाढला; नांदेड जिल्ह्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात

करियर
पावसाअभावी वाढलेल्या उष्णतेमुळे प्रशासनाचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य 22 जूनपासून शाळांच्या वेळेत बदल, सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंत वर्ग इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या सर्व शाळांना आदेश लागू राज्य मंडळ, सीबीएसई व इतर सर्व बोर्डांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय नांदेड | जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार, 22 जून 2026 (सोमवार) पासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 8 ते दु...
तृतीयपंथी संशोधक डॉ. सान्वी जेठवाणी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित ज्युनियर फेलोशिपसाठी निवड

तृतीयपंथी संशोधक डॉ. सान्वी जेठवाणी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित ज्युनियर फेलोशिपसाठी निवड

करियर
नांदेड | नांदेडच्या सुप्रसिद्ध तृतीयपंथी समाजसेविका, लावणी कलाकार, सांस्कृतिक कार्यकर्त्या व संशोधक डॉ. सान्वी जगदीश जेठवाणी यांची भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक साधन व्यक्ती आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT) मार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या “Award of Junior Fellowship (Batch 2025–2026)” या प्रतिष्ठित राष्ट्रीय फेलोशिपसाठी निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या अर्जांची कठोर छाननी, तज्ज्ञ समितीचे मूल्यमापन आणि निवड प्रक्रियेनंतर त्यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. जेठवाणी यांचा संशोधन विषय “Performing Identities: A Socio-Cultural Study of Transgender Participation in Lavani Folk Tradition of Maharashtra” असा असून, या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील लावणी लोकपरंपरेमध्ये तृतीयपंथी कलाकारांचे योगदान, त्यांचा सांस्कृतिक वारसा, सामाजिक स्थान, संघर्ष, कलात्मक अभिव्यक्ती आणि बदलती ओळख यांचा शास्...
error: Content is protected !!