
नांदेडच्या गुणवंताने मिळवले सनदी लेखापाल (CA) पद; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
नांदेड | नांदेड शहरातील प्रतिष्ठित उद्योजक तथा वामनराव पावडे मंगल कार्यालय आणि गंगोत्री स्वीट हॉलचे संचालक बालासाहेब किशनराव पावडे (दीपनगर) यांचे सुपुत्र गुणवंत बालासाहेब पावडे यांनी पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल (Chartered Accountant – CA) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.



इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत गुणवंत यांनी हे यश मिळवून आपल्या कुटुंबासह नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.



या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, गुरुजन आणि बहीण डॉ. गायत्री पावडे यांना दिले. गुणवंत यांनी आपले शालेय शिक्षण गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पूर्ण केले असून, त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे हे यश असल्याचे मानले जात आहे.


गुणवंत पावडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बजरंग पुरी, रेखाताई पावडे, बालासाहेब पावडे, दिलीप अनगुलवार, गजानन देशमुख, संतोष बोहारे, गणेश मोरे, गंगाधर मच्छे, प्रतापराव पावडे, ब्रह्मानंद अनमोड, गुणवंत शरपे, डॉ. शिवाजी राचेवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सीए परीक्षेतील या यशामुळे पावडे कुटुंबासह नांदेड शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


