हु.ज.पा. महाविद्यालयात कृषीदिन निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील (हु.ज.पा.) महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषीदिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे होते. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी इतिहास विभागाचे प्रा. डॉ. व्ही. व्ही. कदम यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, त्यांनी कृषी विकास, जलव्यवस्थापन, ऊर्जानिर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, कामगार कल्याण आणि राज्याच्या आर्थिक विकासासाठी मोलाचे योगदान दिले. शेती क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या दूरदृष्टीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात कृषी विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाच्या स्मरणार्थ त्यांची जयंती राज्यभर ‘कृषीदिन’ म्हणून साजरी केली जाते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. के. बी. पाटील यांनी केले, तर प्रा. पी. ई. सांवत यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!