
दिलीप नवसागरे तालुकाध्यक्ष; पंचशील बुद्ध विहारात निवड प्रक्रिया संपन्न
हदगाव, गौतम वाठोरे | भारतीय बौद्ध महासभा, हदगाव तालुका शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. रविवार (दि. २८ जून) रोजी हदगाव येथील पंचशील बुद्ध विहार येथे झालेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.


निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड होते. जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्षपदी दिलीप तुकाराम नवसागरे, सरचिटणीसपदी संदीप बापूराव सोनुले आणि कोषाध्यक्षपदी गौतम रेखाजी काकबांडे यांची निवड करण्यात आली.


याशिवाय उपाध्यक्ष (संस्कार) सोनबाराव कामाजीराव दवणे, उपाध्यक्ष (पर्यटन/प्रसार) कचरू बाणाजी वाढवे, उपाध्यक्ष (संरक्षण) बोधीपाल रामराव जमदाडे, कार्यालयीन सचिव शेषराव विठ्ठलराव कदम, हिशोब तपासणीस प्रा. राजेश कोंडबाराव राऊत, संस्कार सचिव विलास संभाजी भालेराव व भगवान शेकोजी गिरबडे, पर्यटन/प्रसार सचिव खंडू माधवराव कदम व रमेश गोपीनाथ राऊत, तसेच संरक्षण सचिव दादाराव सखाराम गिरबडे व सोनबा देवराव गिरबडे यांची निवड करण्यात आली.


संघटन विस्तारासाठी सर्कलनिहाय संघटकांचीही नियुक्ती करण्यात आली. तामसा सर्कलसाठी दिलीप नागोराव ढोले, आष्टी सर्कलसाठी भीमराव हरिभाऊ सोनुले, मनाठा सर्कलसाठी विनायक वाधू सावतकर, निवघा सर्कलसाठी मारोती कचरू कदम, तर हदगाव सर्कलसाठी माधवराव गोविंदराव मुतेश्वर आणि विजयकुमार चांदराव परघणे यांची निवड झाली.


ही निवड प्रक्रिया भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) यांच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकुटे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, जिल्हा संघटक कुमारस्वामी माने, रामराव नरवाडे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीने संघटना अधिक मजबूत करणे, बौद्ध समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी कार्य करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
