सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जनजागृतीसाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जनजागृतीसाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामाजिक
एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही नांदेड | भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मतदार पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. माध्यमांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, 30 जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन गणना पत्रके भरत असून, सर्व पात्र मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन या मोहिमेला सहकार्य करावे. 2002 च्या विशेष पुनरिक्षणात समाविष्ट असलेल्या मतदारांना केवळ माहितीची पडताळ...
पतंजली योग परिवारातर्फे राज्य प्रभारींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पतंजली योग परिवारातर्फे राज्य प्रभारींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सामाजिक
नांदेड, अनिल मादसवार| पतंजली योग समिती, महाराष्ट्र (पूर्व) चे राज्य प्रभारी अनिल अमृतवार यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजली योग परिवार, नांदेड यांच्या वतीने कंधार तालुक्यातील संगूची वाडी येथे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. बालाजी वारकड यांच्या शेतात आठ आंबा व चार जांभूळ अशा एकूण १२ फळझाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात पंढरीनाथ कंठेवाड, अरुण दमकोंडवार, अनिल अमृतवार, बालाजी वारकड, देवेश सलगरकर, अनिल कदम, विष्णू शिंदे, बाबाराव हंबर्डे, पंडित पाटील, सदाशिवराव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, सुनील कुंभार, धोंडीबा वारकड, प्रल्हाद वाडकर, खुशाल वारकड, दिनेश वारकड, चैतन्य वारखेड, सतीश कवटीकवार, सतीश पाटील, जयंत सोमवाड, भास्कर पोधाडे, संजय गायकवाड, यश पानपट्टे, गणेश नांदेडकर, नागनाथ मेलकदवाड, विलास पंदीलवाड, शिवाजी पेन्सलवार, हनुमंत ढगे, रमेश बंडेवार, अनिल कामी...
जुलैअखेरपर्यंत ४० हजारांहून अधिक अपूर्ण घरकुले पूर्ण करा; सीईओ महेश पाटील यांचे आदेश

जुलैअखेरपर्यंत ४० हजारांहून अधिक अपूर्ण घरकुले पूर्ण करा; सीईओ महेश पाटील यांचे आदेश

सामाजिक
प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना नांदेड | प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत तिसरा हप्ता वितरित झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांचे बांधकाम जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले. जिल्हा परिषदेत आयोजित तालुकानिहाय आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच विविध राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, सर्व विभागप्रमुख आणि जिल्ह्यातील गट विकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग...
मनपा आयुक्त ॲक्शन मोडमध्ये! संवेदनशील भागांची पाहणी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश

मनपा आयुक्त ॲक्शन मोडमध्ये! संवेदनशील भागांची पाहणी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश

सामाजिक
नांदेड | भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने ॲक्शन मोड घेत शहरातील पूरप्रवण व संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. उर्दू घर परिसर, असदवन–लातूर फाटा नाला, रवीनगर–कौठा पोलीस चौकी तसेच शगुन सिटी परिसराची पाहणी करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नाल्यांची तातडीने सफाई, पाणी निचऱ्याचे मार्ग मोकळे ठेवणे, अतिरिक्त कर्मचारी व यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, मनपाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्याचे आदेश देत सर्व झोनल अधिकारी व अभियंत्यांनी मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना तत्काळ राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट के...
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची कडक मोहीम; गर्भवती महिलांचे ट्रॅकिंग सुरू

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची कडक मोहीम; गर्भवती महिलांचे ट्रॅकिंग सुरू

सामाजिक
नांदेड | स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आता पूर्णपणे 'ॲक्टिव्ह मोड'वर आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पहिली किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांतील गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत नियमित ट्रॅकिंग करण्यात येत असून, या मोहिमेच्या अंमलबजावणीला चार महिने पूर्ण होत आले आहेत. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गर्भधारणेची नोंदणी झाल्यानंतर संबंधित महिलेचा दरमहा फॉलोअप घेतला जात असून, विशेषतः पहिली किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून होणारे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. संशयास्पद प्रकरणा...
शासकीय कार्यक्रमानंतर दिव्यांग युवकावर दुहेरी संकट; सक्षम हातालाही फ्रॅक्चर, प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी

शासकीय कार्यक्रमानंतर दिव्यांग युवकावर दुहेरी संकट; सक्षम हातालाही फ्रॅक्चर, प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी

सामाजिक
नांदेड | नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात प्रकृती बिघडून कोसळलेल्या दिव्यांग युवकाच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. आधीच एका हाताला व एका पायाला पक्षाघात (पॅरॅलिसिस) झालेल्या कार्तिक कुमार भरतीपूरम यांच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर झाल्याने त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत व संपूर्ण उपचाराचा खर्च उचलावा, अशी मागणी केली आहे. दिनांक २६ जून २०२६ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या निरोप समारंभ आणि नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दीर्घकाळ प्रतीक्षा, अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि प्रकृती बिघडल्यामुळे कार्तिक...
मतदार नोंदणी मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी जुना कौठा येथे स्वतः भरून घेतले अर्ज

मतदार नोंदणी मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी जुना कौठा येथे स्वतः भरून घेतले अर्ज

सामाजिक
नवीन नांदेड | मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेला गती देण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुढाकार घेत मनपा हद्दीतील जुना कौठा येथे नागरिकांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी अर्ज स्वतः भरून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जुना कौठा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी नगरसेवक राजू गोरे यांच्या निवासस्थानी भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजी रामजी गोरे यांचा मतदार नोंदणीसाठीचा एसआयआर (SIR) अर्ज बीएलओच्या उपस्थितीत स्वतः भरून घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला. नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली वसरणी विभागातील भाग क्रमांक १८२ मध्ये मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी...
एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात फॉर्म वाटपाचा शुभारंभ; उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ व तहसीलदार वारकड यांनी घेतला आढावा

एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात फॉर्म वाटपाचा शुभारंभ; उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ व तहसीलदार वारकड यांनी घेतला आढावा

सामाजिक
नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको परिसरातील रामनगर भागाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. ३० जून २०२६ पासून ८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बीएलओंकडून मतदारांना नाव नोंदणीसाठी आवश्यक फॉर्मचे वाटप व माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. खल्लाळ आणि तहसीलदार वारकड यांनी यादी भाग क्रमांक २०८ मधील मतदारांशी संवाद साधत कामकाजाची पाहणी केली. त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून बीएलओंना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सूरज स्वामी,...
हिमायतनगर शहरात मतदार पडताळणी मोहीम सुरू; SIR फॉर्म भरण्याचे आवाहन

हिमायतनगर शहरात मतदार पडताळणी मोहीम सुरू; SIR फॉर्म भरण्याचे आवाहन

सामाजिक
हिमायतनगर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच सोशल मीडियाद्वारे आवाहन  हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील सर्व मतदारांसाठी विशेष मतदार पडताळणी (SIR) मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित कालावधीत फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे मतदार यादीतील माहितीची पडताळणी व अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःची माहिती नोंदवून घ्यावी तसेच आपल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनाही याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. फॉर्म भरताना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो, स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ही कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत. ही मोहीम ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बी.एल.ओ. (BLO) मार्फत राबविण्यात येणार असून, नागरिकांनी वेळेत फॉर...
ज्येष्ठ कलावंत व साहित्यिकांसाठी सुवर्णसंधी; मानधन सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा

ज्येष्ठ कलावंत व साहित्यिकांसाठी सुवर्णसंधी; मानधन सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा

सामाजिक
राजर्षी शाहू महाराज योजनेचा लाभ घेण्याचे बाबूराव पाटील यांचे आवाहन भोकर | राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'राजर्षी शाहू महाराज वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक मानधन सन्मान योजने' अंतर्गत सन २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक आणि लोककला जतन करणाऱ्या कलाकारांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून या सन्माननीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशासकीय सदस्य तथा कलावंत-साहित्यिक बाबूराव पाटील यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (निवड समिती अध्यक्ष) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी (सचिव) यांनीही पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या योज...
error: Content is protected !!