
नांदेड, अनिल मादसवार| पतंजली योग समिती, महाराष्ट्र (पूर्व) चे राज्य प्रभारी अनिल अमृतवार यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजली योग परिवार, नांदेड यांच्या वतीने कंधार तालुक्यातील संगूची वाडी येथे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. बालाजी वारकड यांच्या शेतात आठ आंबा व चार जांभूळ अशा एकूण १२ फळझाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.



या उपक्रमात पंढरीनाथ कंठेवाड, अरुण दमकोंडवार, अनिल अमृतवार, बालाजी वारकड, देवेश सलगरकर, अनिल कदम, विष्णू शिंदे, बाबाराव हंबर्डे, पंडित पाटील, सदाशिवराव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, सुनील कुंभार, धोंडीबा वारकड, प्रल्हाद वाडकर, खुशाल वारकड, दिनेश वारकड, चैतन्य वारखेड, सतीश कवटीकवार, सतीश पाटील, जयंत सोमवाड, भास्कर पोधाडे, संजय गायकवाड, यश पानपट्टे, गणेश नांदेडकर, नागनाथ मेलकदवाड, विलास पंदीलवाड, शिवाजी पेन्सलवार, हनुमंत ढगे, रमेश बंडेवार, अनिल कामीनवार आदी मान्यवर सहभागी झाले. वृक्षारोपणानंतर सर्वांनी वनभोजनाचाही आनंद घेतला.



यावेळी आयोजकांनी सांगितले की, २०१८ पासून अनिल अमृतवार आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी योगसाधकांच्या शेतात वृक्षारोपणाचा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. विविध गावांमध्ये लावलेल्या अनेक झाडांचे आज यशस्वी संवर्धन झाले असून काही झाडांना फळधारणाही सुरू झाली आहे.


यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी ‘झाडे लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांचे संगोपन करणे आवश्यक’ असल्याचा संदेश देण्यात आला. वृक्ष भविष्यात ऑक्सिजन, सावली, फळे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे जतन करण्याचे आवाहन पतंजली योग परिवाराच्या वतीने करण्यात आले.


