सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लोहा शहरावरील पाणी संकट टळले; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश

लोहा शहरावरील पाणी संकट टळले; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश

सामाजिक
लोहा | लोहा शहरावर ओढवलेले भीषण पाणी संकट अखेर टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या टीमने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगर परिषदेने अधिकृत प्रस्ताव सादर केल्यानंतर बुधवारी (15 जुलै) पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता. एप्रिल महिन्यात लिंबोटी धरणातून दीड दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अकरा गावांच्...
घरबसल्या मिळवा परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवा; अनधिकृत मध्यस्थांपासून सावध राहा

घरबसल्या मिळवा परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवा; अनधिकृत मध्यस्थांपासून सावध राहा

सामाजिक
नांदेड| परिवहन विभागाच्या 'सारथी 4.0' आणि 'वाहन 4.0' या ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिकांना वाहन परवाना व वाहन नोंदणीसंदर्भातील 58 फेसलेस सेवा आता घरबसल्या उपलब्ध झाल्या आहेत. या सेवांमुळे कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करता येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी दिली. परिवहन विभागाच्या 115 अधिसूचित सेवांपैकी 89 सेवा ऑनलाइन उपलब्ध असून, त्यातील 58 सेवा पूर्णपणे फेसलेस आहेत. नागरिकांनी अर्ज करताना केवळ अधिकृत शासकीय शुल्कच भरावे आणि कोणत्याही अनधिकृत मध्यस्थाला अतिरिक्त पैसे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी माहिती व मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, अतिरिक्त शुल्काची मागणी झाल्यास तात्काळ आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे....
वाढोना (हिमायतनगर) येथे वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

वाढोना (हिमायतनगर) येथे वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

सामाजिक
महावितरणच्या कारभाराविरोधात धडक मोर्चाचा इशारा हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वाढोना येथे महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लपंडावामुळे नियमित वीजबिले भरूनही ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे परिसरात मोठा पाऊसही झालेला नसतानाही वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शहरातील अस्वच्छता आणि साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुध...
हिमायतनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी पंढरीनाथ येरेकार यांचे दुःखद निधन

हिमायतनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी पंढरीनाथ येरेकार यांचे दुःखद निधन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)चे सेवानिवृत्त कर्मचारी तथा धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे पंढरीनाथ घोलबा येरेकार (खडकीकर) (वय ७६) यांचे मंगळवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हिमायतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील एक समर्पित कार्यकर्ता हरपल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. शांत, संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांचा समाजात मोठा स्नेहसंबंध होता. त्यांच्यावर बुधवारी (दि. १५ जुलै) सकाळी ११ वाजता हिमायतनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी (बोरगडी रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना व नात...
वाघीत व्यसनमुक्तीकडे सकारात्मक पाऊल; शेकडो ग्रामस्थांचा निर्धार

वाघीत व्यसनमुक्तीकडे सकारात्मक पाऊल; शेकडो ग्रामस्थांचा निर्धार

सामाजिक
पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या पुढाकारातून व्यसनमुक्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद हिमायतनगर, अनिल मादसवार| "व्यसन सोडू... कुटुंब वाचवू" हा संदेश देत हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथे आयोजित व्यसनमुक्ती शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या प्रेरणेतून १३ व १४ जुलै रोजी आयोजित या उपक्रमात अनेक नागरिकांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना होमिओपॅथिक औषधांचे वितरण, समुपदेशन आणि व्यसनमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दारूच्या व्यसनामुळे कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगत पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवन स्वीकारण्याचे आवाहन केले. "प्रत्येक गाव व्यसनमुक्त झाले, तर समाज अधिक निरोगी, सुरक्षित आण...
नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत; मीरा जाधव पाटील यांचे आवाहन

नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत; मीरा जाधव पाटील यांचे आवाहन

सामाजिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना २०२६-२७' अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत, शाहीर आणि लोकपारंपरिक कलाकारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत 'आपले सरकार' पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन मानधन निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) डी. बी. गिरी यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी ४० वर्षे वयोमर्यादा आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून ६० हजार रुपयांपर्यंत असावे. तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवा...
सिडकोतील रमामाता आंबेडकर चौकात जड वाहनांना प्रतिबंध; लोखंडी कमान पुन्हा कार्यान्वित

सिडकोतील रमामाता आंबेडकर चौकात जड वाहनांना प्रतिबंध; लोखंडी कमान पुन्हा कार्यान्वित

सामाजिक
नवीन नांदेड | सिडको परिसरातील रमामाता आंबेडकर चौक (ढवळे कॉर्नर) येथे जड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पुढाकारातून या ठिकाणी जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी कमान पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. नांदेड–उस्माननगर रोड, एमआयडीसी कॉर्नर ते रमामाता आंबेडकर चौक आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर ट्रक, टिपर, डंपरसह मोठ्या वाहनांची भरधाव वाहतूक होत होती. या मार्गावर मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. यापूर्वी बसविण्यात आलेली लोखंडी कमान अज्ञात वाहनाने नुकसानग्रस्त केली होती. त्यामुळे पुन्हा जड वाहनांची वर्दळ वाढली होती. अखेर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सा...
हरडफ फाट्यावरील धोकादायक खड्डे अखेर बुजले; शरद कदम यांच्या पाठपुराव्याला यश

हरडफ फाट्यावरील धोकादायक खड्डे अखेर बुजले; शरद कदम यांच्या पाठपुराव्याला यश

सामाजिक
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्यातील हरडफ फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत युवा नेते शरद कदम यांनी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार कदम यांनी तत्काळ मुरूम उपलब्ध करून देत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या पावसाळ्यामुळे हरडफ फाट्यावरील सुमारे ३०० मीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, ठेकेदाराने ३०० मीटरचा भाग अपूर्ण सोडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोशल मीडियाव...
पतंजली योग परिवाराचे नाईक नगर उद्यानात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छता हीच खरी संस्कृती’चा संदेश

पतंजली योग परिवाराचे नाईक नगर उद्यानात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छता हीच खरी संस्कृती’चा संदेश

सामाजिक
नांदेड | सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देत पतंजली योग परिवाराच्या वतीने नांदेड शहरातील नाईक नगर परिसरातील उद्यानात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात उद्यान परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स व गुटख्याची पाकिटे, खराब चप्पल, कपड्यांचे तुकडे तसेच अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची घंटागाडीमार्फत योग्य विल्हेवाट लावण्यात आली. नाईक नगर परिसरातील हे उद्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती आणि लहान मुलांसाठी फिरणे, व्यायाम करणे तसेच उद्यानातील मंदिरात दर्शनासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र काही नागरिकांकडून निष्काळजीपणे कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार म्हणाले, "दुसऱ्याने टाकलेला कचरा उचलणे ...
‘बाबा… तुमच्यासाठी!’ शब्दोत्सवातून पित्याप्रती कृतज्ञतेला शब्दांची मानवंदना

‘बाबा… तुमच्यासाठी!’ शब्दोत्सवातून पित्याप्रती कृतज्ञतेला शब्दांची मानवंदना

सामाजिक
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंचाचा प्रेरणादायी उपक्रम नांदेड| भारतीय संस्कृतीचा प्राण असलेली कुटुंब व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचा कणखर आधारवड असलेल्या पित्याप्रती कृतज्ञतेच्या भावना समाजासमोर व्यक्त करण्यासाठी चळवळी योद्धे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "बाबा... तुमच्यासाठी!" या आगळ्यावेगळ्या भावस्पर्शी शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या सामाजिक प्रवाहात पित्याच्या त्याग, प्रेम, संस्कार आणि संघर्षाला शब्दरूप देणारा हा उपक्रम समाजमनाला निश्चितच भावनिक स्पर्श करणारा ठरणार आहे. भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे कुटुंब संस्था. असंख्य सामाजिक, सांस्कृतिक आणि पाश्चिमात्य विचारांच्या प्रखर लाटांनी या संस्थेवर अनेकदा आघात केले, तरीही भारतीय कुटुंबव्यवस्था आजही आपल्या मूल्यांचा दीप तेवत ठेवून ताठ मानेने उभी आहे. या कुटुंब संस्थेचा खंबीर आ...
error: Content is protected !!