ज्येष्ठ नागरिक शंकरराव रामजी पंदलवाड यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील धानोरा (ज.) येथील ज्येष्ठ नागरिक शंकरराव रामजी पंदलवाड (वय १००) यांचे दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते दैनिक गोदातीरचे पत्रकार तथा ॲड. ज्ञानेश्वर पंदलवाड यांचे वडील होत.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पंदलवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या शांत, साध्या व प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.

स्व. शंकरराव रामजी पंदलवाड यांच्यावर सोमवार दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता धानोरा (ज.) ता. हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ALM Bharat टीमच्या वतीनेभावपूर्ण श्रद्धांजली…! 🕯️🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!