पंचायत समितीचे अधिकारी व्यंकटेश ऊर्फ बाळु दमकोंडवार यांचे दुःखद निधन : सोमवारी अंत्यसंस्कार

हिमायतनगर| येथील पंचायत समितीचे वरीष्ठ सहाय्यक व्यंकटेश ऊर्फ बाळु अशोकराव दमकोंडवार (वय 50 वर्ष) यांचे दि. 7 रविवारी सायंकाळी 4:30 वाजता उपचारा दरम्यान नांदेडच्या खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाल.

त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर दि. 8 सोमवारी सकाळी 11;00 वाजता हिमायतनगर – बोरगडी रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ते प्रसिध्द व्यापारी रविंद्र दमकोंडवार यांचे चुलत बंधु, सुनिल दमकोंडवार यांचे मोठे बंधु, कै. अशोक दमकोंडवार सर यांचे मोठे चिरंजीव होत.

त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांचे मुळ गाव सरसम सह हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली आहे, तालुक्यात त्यांचा चाहता वर्ग मोठा असुन ते  सर्वांशी आपुलकीने वागत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!