वृद्धापकाळाने मुक्ताबाई हरी वाठोरे यांचे निधन

हदगाव | तालुक्यातील हरडफ येथील रहिवासी तथा सध्या अंबा नगर, सांगवी (नांदेड) येथे वास्तव्यास असलेल्या मुक्ताबाई हरी वाठोरे (वय ८५) यांचे आज रविवार, दि. ७ जून रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्यावर आज रविवार, दि. ७ जून रोजी दुपारी ३ वाजता अंबा नगर, सांगवी (नांदेड) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या राहुल वाठोरे व शंकर वाठोरे यांच्या मातोश्री होत.

मुक्ताबाई वाठोरे यांनी आपले आयुष्य धम्ममय पद्धतीने व्यतीत केले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक, मित्रपरिवार व समाजबांधवांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

यावेळी गौतम वाठोरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “राहुल वाठोरे यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मुक्ताबाई यांच्या सहवासात बराच काळ घालवला. गेल्या आठवड्यातच त्यांची भेट घेतली होती. त्यांनी धम्ममय जीवन जगले. मृत्यू हा अनित्य आणि शाश्वत सत्य आहे. त्यांचे विचार व कार्य कायम स्मरणात राहतील.”
मुक्ताबाई हरी वाठोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमो बुद्धाय | जय भीम 💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!