
नांदेड, प्रतिनिधी | नांदेड येथील ज्येष्ठ नागरिक कै. राधाकिशनजी द्वारकादासजी दाड (वय 87) यांचे आज बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सकाळी 10.12 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दाड परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


कै. राधाकिशनजी दाड हे गोपिकिशनजी दाड यांचे ज्येष्ठ बंधू होते. तसेच डॉ. पुरुषोत्तम दाड, अशोक दाड, प्रा. कैलास दाड व विनोद दाड यांचे वडील होते. राजगोपाल दाड, रामदेव दाड, रामेश्वर दाड व गोपाल तोतला यांचे मोठे वडील म्हणूनही त्यांची ओळख होती. तसेच अमितज दाड, शुभम दाड, डॉ. गणेश दाड, केदार दाड व डॉ. यश दाड यांचे ते आजोबा होते.


त्यांची अंतिम यात्रा आज सायंकाळी 5 वाजता गोकुळ नगर येथील ‘द्वारका निवास’ या राहत्या घरातून निघणार असून, गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.


कै. राधाकिशनजी दाड यांच्या निधनाने दाड परिवारावर शोककळा पसरली असून, नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दाड परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏


