सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील योगी पीठाचे मानद योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने योगसाधना क्षेत्रासह हिमायतनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता लकडोबा चौक येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजई, मुलं, असा मोठा परिवार आहे. योगसाधना आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत. स्व. परमेश्वर पानपट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏...
आ. बाबुराव कदम यांच्या हस्ते हदगाव आगारात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण

आ. बाबुराव कदम यांच्या हस्ते हदगाव आगारात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण

सामाजिक
प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव हदगाव, गौतम वाठोरे| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हदगाव आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या बससेवेमुळे मतदारसंघातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन बसगाड्यांच्या आगमनामुळे हदगाव आगाराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, प्रवाशांना आधुनिक सुविधांसह सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता एसटी महामंडळाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आगारप्रमुख धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य ढोले बापू, नगराध्...
विविध भावभावनांचे गुंफण करणारा संग्रह: फुंकर–सौ. सुचिता वडजे (जोगदंड)

विविध भावभावनांचे गुंफण करणारा संग्रह: फुंकर–सौ. सुचिता वडजे (जोगदंड)

सामाजिक
नांदेड| हालाकीच्या परिस्थितीत शिक्षणाचे अज्ञान असलेल्या शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. कमी वयातच वडिलांचे छत्र हरवले आणि सोबत बहिणीची माया ही हरवली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे सुरू झाले तर दुसरीकडे शिक्षणाचा प्रवास थांबला पण बालपणापासूनच त्यांच्या मनात झालेल्या परिस्थितीचा परिणाम त्यांना चिंतन करायला भाग पाडत गेला. चिंतन करताना अंधाऱ्या रात्री मनात त्यांच्या शब्दांची जुळवाजुळव नकळतच होऊ लागली आणि हळूहळू हा रोजचाच नित्यक्रम झाला. यात परिस्थितीची चिंतन करत असताना एका कवीचा जन्म झाला. आयुष्यात आलेल्या चढउतारात फुंकर घालणारी व्यक्ती असल्यास माणसाच्या जीवनात अजून संघर्ष करण्यास बळ मिळतं, याचे महत्त्व सांगणारा फुंकर कवितासंग्रह . पुस्तकाचं शीर्षक असलेल्या पहिल्याच कवितेत ज्यात कवी दुःख,संघर्ष, झळा,अवघड वाटा, अनवाणी पायाला टोचणारे काटे सगळं सहन करतो फक्त त्याच्या मनावर नवी ...
पंधरा दिवसांपासून पाऊस नाही; हिमायतनगरात सामाजिक वनीकरणाची रोपे मात्र ‘कागदावर’ हिरवी!

पंधरा दिवसांपासून पाऊस नाही; हिमायतनगरात सामाजिक वनीकरणाची रोपे मात्र ‘कागदावर’ हिरवी!

सामाजिक
हिमायतनगर तालुक्यात वृक्षलागवडीच्या नावाखाली शासनाच्या निधीची उधळपट्टी? लावलेली ५० टक्के रोपे वाळली; शेकडो रोपे उघड्यावर फेकली..! सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..! हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, याच काळात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या वृक्षलागवडीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सवना, सिरंजणी, पळसपूर आणि हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या रोपांपैकी तब्बल ५० टक्के रोपे पाण्याअभावी वाळून गेल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे. रोपे लावली, फोटो काढले आणि जबाबदारी संपली का? वृक्षलागवड झाल्यानंतर रोपांना पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही विभागाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात रोपे लावून त्यांची देखभाल करण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल...
चौपाटीवर मतदारांची गर्दी; ‘माझं नाव मतदार यादीत आहे ना?’ याची खात्री करण्यासाठी हजारोंची धावपळ

चौपाटीवर मतदारांची गर्दी; ‘माझं नाव मतदार यादीत आहे ना?’ याची खात्री करण्यासाठी हजारोंची धावपळ

सामाजिक
SIR कॅम्पला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नाव व माहिती दुरुस्तीला प्राधान्य तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पुढाकारातून कॅम्पची सुरुवात हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नेहमी गजबजणाऱ्या हिमायतनगरच्या चौपाटीवर गुरुवारी राजकीय सभा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष मतदार पडताळणी (SIR) कॅम्पमुळे चौपाटी परिसराला अक्षरशः ‘मतदार पडताळणी केंद्रा’चे स्वरूप आले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कॅम्पमध्ये हजारो महिला-पुरुष मतदारांनी सहभाग घेतला. नाव, पत्ता आणि मतदार यादीतील इतर माहिती तपासण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. विशेषतः २००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्य...
एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात १०० वृक्षांचे वृक्षारोपण

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात १०० वृक्षांचे वृक्षारोपण

सामाजिक
नांदेड | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात मंगळवारी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, प्रवासी आणि प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले. "वृक्षारोपण ही काळाची गरज असली तरी वृक्षांचे संगोपन होऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली, तरच या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश मिळेल," असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवदास हमंद यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला परिवहन अधिकारी चिन्मय चिटणीस, आगारप्रमुख दिग्...
लोहा शहरावरील पाणी संकट टळले; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश

लोहा शहरावरील पाणी संकट टळले; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश

सामाजिक
लोहा | लोहा शहरावर ओढवलेले भीषण पाणी संकट अखेर टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या टीमने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगर परिषदेने अधिकृत प्रस्ताव सादर केल्यानंतर बुधवारी (15 जुलै) पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता. एप्रिल महिन्यात लिंबोटी धरणातून दीड दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अकरा गावांच्...
घरबसल्या मिळवा परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवा; अनधिकृत मध्यस्थांपासून सावध राहा

घरबसल्या मिळवा परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवा; अनधिकृत मध्यस्थांपासून सावध राहा

सामाजिक
नांदेड| परिवहन विभागाच्या 'सारथी 4.0' आणि 'वाहन 4.0' या ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिकांना वाहन परवाना व वाहन नोंदणीसंदर्भातील 58 फेसलेस सेवा आता घरबसल्या उपलब्ध झाल्या आहेत. या सेवांमुळे कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करता येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी दिली. परिवहन विभागाच्या 115 अधिसूचित सेवांपैकी 89 सेवा ऑनलाइन उपलब्ध असून, त्यातील 58 सेवा पूर्णपणे फेसलेस आहेत. नागरिकांनी अर्ज करताना केवळ अधिकृत शासकीय शुल्कच भरावे आणि कोणत्याही अनधिकृत मध्यस्थाला अतिरिक्त पैसे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी माहिती व मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, अतिरिक्त शुल्काची मागणी झाल्यास तात्काळ आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे....
वाढोना (हिमायतनगर) येथे वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

वाढोना (हिमायतनगर) येथे वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

सामाजिक
महावितरणच्या कारभाराविरोधात धडक मोर्चाचा इशारा हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वाढोना येथे महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लपंडावामुळे नियमित वीजबिले भरूनही ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे परिसरात मोठा पाऊसही झालेला नसतानाही वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शहरातील अस्वच्छता आणि साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुध...
हिमायतनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी पंढरीनाथ येरेकार यांचे दुःखद निधन

हिमायतनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी पंढरीनाथ येरेकार यांचे दुःखद निधन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)चे सेवानिवृत्त कर्मचारी तथा धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे पंढरीनाथ घोलबा येरेकार (खडकीकर) (वय ७६) यांचे मंगळवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हिमायतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील एक समर्पित कार्यकर्ता हरपल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. शांत, संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांचा समाजात मोठा स्नेहसंबंध होता. त्यांच्यावर बुधवारी (दि. १५ जुलै) सकाळी ११ वाजता हिमायतनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी (बोरगडी रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना व नात...
error: Content is protected !!