पेठवडज येथे वादळी वाऱ्यासह गारपीट : फळ पिकांचे प्रचंड नुकसान.!
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील पेठवडज सह काही गावांमध्ये झालेल्या गारपीटीमध्ये फळबागेचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घालत अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून ऐकावस मिळत आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे सर्वसामान्य जनतेची एकच धांदल उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ७ मे गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास अचानक हवामानामध्ये बदल होत थंड वारे सुरू झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी एक ते दीड च्या दरम्यान पेठवडजसह गोणार, शिरशी बुद्रुक, शिरशी खुर्द, कलाळी, मंगनाळी, या गावासह अनेक गावांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट होऊन शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील आंबा, चिकू, टरबूज या फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिक...








