मुंबई–हैदराबाद ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वेसाठी खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी

मनमाड–छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना पत्र
नांदेड | मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना अत्याधुनिक रेल्वे सेवेचा लाभ मिळावा, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मनमाड–छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गे मुंबई–हैदराबाद ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे.

भारतीय रेल्वेकडून देशातील प्रमुख शहरांना ‘वंदे भारत स्लीपर’ सेवेद्वारे जोडण्याची तयारी सुरू असताना, या मार्गाचाही विचार व्हावा, अशी विनंती खा. चव्हाण यांनी केली आहे.

पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मनमाड–छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गे मुंबई–हैदराबाद वंदे भारत स्लीपर सेवा सुरू झाल्यास मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण आणि पर्यटनालाही चालना मिळेल.

या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी, अशी अपेक्षाही खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!