
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहपूर्ण व सलोख्याच्या वातावरणात पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवड प्रक्रियेत ॲड. शिवकिरण भारती यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने वकिलांच्या हितसंवर्धनाबरोबरच न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


नवीन कार्यकारिणीत ॲड. दीपक आर. पवार यांची उपाध्यक्ष, ॲड. रेखा हिवराळे यांची महिला उपाध्यक्ष, ॲड. शिवराज फाळेगावकर यांची सचिव, ॲड. मारोती बनसोडे यांची सहसचिव, ॲड. रामदास डावरे यांची कोषाध्यक्ष, ॲड. अविनाश नरवाडे यांची विशिष्ट सहाय्यक (पुरुष) आणि ॲड. स्वरूपा भोसले यांची विशिष्ट सहाय्यक (महिला) म्हणून निवड करण्यात आली.


कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. दिगंबर कदम, ॲड. नवनाथ बाभळीकर, ॲड. एस. जे. तोष्णीवाल, ॲड. डी. एस. माने, ॲड. ए. एस. सावतकर आणि ॲड. ए. पी. राऊत यांची सर्वानुमते निवड झाली.


निवड प्रक्रियेदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजकुमार देशमुख (वाकीकर), ॲड. जी. डी. पंडित, ॲड. मदनी, ॲड. संतोष टिकोरे, ॲड. शिंदे, ॲड. डी. एस. पाईकराव (येळंमकर), ॲड. प्रवीण लोमटे यांच्यासह वकील संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. शिवकिरण भारती यांनी वकील संघात एकोपा कायम राखत वकिलांच्या व्यावसायिक अडचणी सोडविणे, न्यायालयीन सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करणे आणि न्यायदान प्रक्रियेला अधिक प्रभावी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण निवड प्रक्रिया शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सर्वसंमतीने पार पडल्याने हदगाव वकील संघातील एकात्मता आणि संघटनात्मक बळ पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
