महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरणासाठी विभागीय समन्वय आवश्यक – विजया रहाटकर

महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरणासाठी विभागीय समन्वय आवश्यक – विजया रहाटकर

महाराष्ट्र
नांदेड| महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरण प्रभावीपणे मिळण्यासाठी महिला व बाल विकास, पोलीस, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, विधी सेवा प्राधिकरण आदी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. तसेच कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश (POSH) अधिनियम, २०१३ अंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खासगी व असंघटित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिलाविषयक विविध योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अ...
वाघी–कामारी नाल्यावरील पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीची मागणी

वाघी–कामारी नाल्यावरील पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीची मागणी

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा भराव ढासळल्याची घटना ताजी असतानाच हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी नाल्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाच्या कॉलममधील काँक्रीट दगडाने आणि हाताने सहज निघत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नुकतेच पूर्ण झालेल्या पुलाच्या खांबावरील काँक्रीट सहज तुटत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या पुलावरून एखादे अवजड वाहन गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कामात संबंधित विभागाचे अभियंते आणि ठेकेदार यांची कथित संगनमत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्य...
हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये घबराट, मात्र कोणतीही जीवितहानी नाही

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये घबराट, मात्र कोणतीही जीवितहानी नाही

महाराष्ट्र
हिंगोली | हिंगोली जिल्ह्याला शनिवारी (११ जुलै) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सकाळी ११:२६ वाजता भूगर्भातून आवाजासह धक्का जाणवल्याने नागरिक काही काळ घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाची ३.५ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू वसई (ता. औंढा नागनाथ) परिसरात असून तो भूगर्भात सुमारे ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे भूकंप मापक केंद्राने नोंदविले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून प्रशासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठ...
माहिती आयोगाच्या आदेशालाही केराची टोपली; किनवटच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला हायकोर्टाचे समन्स

माहिती आयोगाच्या आदेशालाही केराची टोपली; किनवटच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला हायकोर्टाचे समन्स

महाराष्ट्र
माहितीसह न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश; सात वर्षांच्या संघर्षानंतर नागरिकाला दिलासा ईस्लापूर/किनवट/नांदेड, प्रतिनिधी| माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत मागवलेली माहिती न देणे आणि राज्य माहिती आयोगाच्या आदेशाचीही अवहेलना करणे नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित जनमाहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी, किनवट यांना माहितीसह प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे, अन्यथा आदेशाचे पालन का केले नाही याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी ६ जुलै २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. सात वर्षांपासून माहितीसाठी संघर्ष याचिकाकर्ते काशिनाथ नारायणराव शिंदे यांनी २० जुलै २०१९ रोजी माहितीचा अधि...
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी

पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी

शेती
नांदेड | खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. मात्र, AGRISTACK Farmer ID आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत पिकांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकराराची माहिती पीक विमा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. योजन...
कर्जमाफीत मोठा दिलासा! ५० हजारांची अट रद्द; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा – मुख्यमंत्री फडणवीस

कर्जमाफीत मोठा दिलासा! ५० हजारांची अट रद्द; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत कर्जमाफीच्या लाभासाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेद्वारे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माहितीनुसार ही योजना राबविण्यात येत आहे. २ लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांनाही दिलासा पूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र नव्या निर्णयानुसार अशा शेतकऱ्यांना...
हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात?

हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात?

महाराष्ट्र
निकृष्ट रस्ते, रखडलेली कामे आणि 'अपडाऊन' संस्कृतीवर संताप हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट दर्जाचे रस्ते, रखडलेली विकासकामे आणि अधिकाऱ्यांच्या कथित मुख्यालयाबाहेरील वास्तव्यासंदर्भात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ते मंगरूळ मार्ग, हिमायतनगर ते बोरगडी रस्ता, डोल्हारी ते गांजेगाव मार्ग, सोनारी फाटा ते वाळकेवाडी–दूधड रस्ता, सवना ते वाशी, टेंभी, अंदेगांव, पवना, चिंचोर्डी ते दगडवाडी मार्ग तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू आहेत. काही प्रकल्पांना तब्बल दोन वर्षे उलटूनही पूर्णत्व आलेल...
पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

शेती
उगवलेली पिके करपू लागली; बोगस बियाण्यांच्या संशयाने शेतकरी हवालदिल हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, उगवलेली पिके करपू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि हळद पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवसांच्या हलक्या सरींनंतर पावसाने पाठ फिरवली. परिणामी जमिनीतील ओलावा संपत चालला असून, अनेक शेतांमध्ये उगवलेली रोपे करपू लागली आहेत. हलक्या जमिनीवरील पिकांची अवस्था सर्वाधिक गंभीर आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असून, अनेक ठिकाणी शेतकरी पावसासा...
हदगाव-हिमायतनगरचा किनवटमध्ये समावेश मान्य नाही; आमदार बाबुराव कदम कोहळीकर ठाम

हदगाव-हिमायतनगरचा किनवटमध्ये समावेश मान्य नाही; आमदार बाबुराव कदम कोहळीकर ठाम

महाराष्ट्र
हदगाव-हिमायतनगरच्या हितासाठी विधानमंडळात बुलंद आवाज हदगाव/हिमायतनगर/नांदेड /मुंबई| हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विधानमंडळात ठाम विरोध दर्शवत मतदारसंघाच्या हिताची जोरदार बाजू मांडली. दोन्ही तालुके किनवट जिल्ह्यात समाविष्ट झाल्यास नागरिकांवर अन्याय होईल आणि प्रशासनापर्यंत पोहोचणे अधिक कठीण होईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू असताना किनवटला जिल्ह्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, हदगाव आणि हिमायतनगर हे दोन्ही तालुके नांदेड जिल्ह्याशी भौगोलिक, प्रशासकीय आणि सामाजिकदृष्ट्या अधिक निगडित असल्याचे आमदार कोहळीकर यांनी सभागृहात नमूद केले. त्यांनी सांगितले की, मतदारसंघातील अनेक गावे आधीच दुर्गम भागात आहेत. अशा परिस्थितीत प्रशासकीय सीमा बदलल्यास नागरि...
उत्कृष्ट कार्याबद्दल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट कार्याबद्दल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार

शेती
नांदेड | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत प्रभावी प्रशिक्षणाचे आयोजन करून पशुपालकांना मार्गदर्शन करणाऱ्या तसेच दुग्धविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नायगाव येथील डॉ. गौतम खिल्लारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत पाच दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भोकर येथील डॉ. संजय रोळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि डॉ. अविनाश बुन्नावार, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी एक दिवसीय प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. ...
error: Content is protected !!