महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य, महाराष्ट्र
मुंबई| जपानी मेंदूज्वरासारख्या धोकादायक संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करत या आजारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत लसीकरण मोहीम सुरू असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या उपाययोजनांमुळे सध्या रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे. आजाराचे स्वरूप आणि धोका जपानी मेंदूज्वर हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून तो मेंदूवर परिणाम करतो. यात झटके येणे, न्यू...
राज्य मराठी पत्रकार परिषदेतून संचालकाचा राजीनामा; संघटनेत खळबळ

राज्य मराठी पत्रकार परिषदेतून संचालकाचा राजीनामा; संघटनेत खळबळ

महाराष्ट्र
नांदेड| राज्य मराठी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली असून, प्रा. डॉ. शिवदास हमंद यांनी आपल्या संचालक पदाचा तसेच मूळ सभासदत्वाचा राजीनामा सादर केला आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पत्रकार संघटनांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दि. १५ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय अध्यक्ष मा. मधुसूदन कुलथे यांना उद्देशून दिलेल्या पत्रामध्ये डॉ. हमंद यांनी आपल्या राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे. माध्यम क्षेत्रातील दैनंदिन कामकाज आणि विविध संघटनांमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “माध्यम क्षेत्रातील दैनंदिन कामे आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना ‘राज्य मराठी पत्रकार परिषद’ या संघटनेतील संचालक पद तसेच मूळ सभासदत्वाचा राजीनामा सादर करीत आहे,” असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्रासोबत त्यांनी संघटनेचे ओळखपत्रही परत केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या...
धावत्या कारने घेतला पेट कार जळून खाक !

धावत्या कारने घेतला पेट कार जळून खाक !

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड - बीदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दिग्रस खुर्द जवळील घटना  कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द गावाजवळ एका हुंडाई कंपनीच्या चालत्या कार ला अचानक आग लागल्याने संपूर्ण कार जळून खाक झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.या घडलेल्या भयंकर घटनेतून कार चालक सुदैवाने बालबाल बचावला आहे. या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील गजानन भोसले वय २८ वर्ष हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे येथे स्थायिक झाले आहेत. ते १३ एप्रिल रोजी काही घरगुती कामानिमित्त पुणे येथून लातूर मार्गे आपली हुंडाई सेंट कार क्रमांक एमएच १२ आरएन ७१२३ ने अंबुलग्याकडे जात असताना नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्ग ५० वरील दिग्रस खुर्द गावाजवळील गांधीनगर पाठीजवळ आले. अचानक कारच्या समोर हरीण आल्यामुळे भोसले यांनी गाडीचे ब्रेक दाबले असता कारने अचानक पेट ...
उन्हाळी सुट्ट्यांत प्रवाशांसाठी दिलासा; CSMT–हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू

उन्हाळी सुट्ट्यांत प्रवाशांसाठी दिलासा; CSMT–हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू

तेलंगणा, महाराष्ट्र
मुंबई/नांदेड (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगर – जालना – परभणी – पूर्णा – नांदेड मार्गे धावणार असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्र. 01011 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 23 एप्रिल ते 9 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 00.20 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 7.50 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्र. 01012 ही विशेष रेल्वे त्याच कालावधीत प्रत्येक गुरुवारी हैदराबाद येथून रात्री 10.00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सायंकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे,...
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर RPF ची धडाकेबाज कारवाई

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर RPF ची धडाकेबाज कारवाई

तेलंगणा, महाराष्ट्र
हरवलेला मोबाईल परत, संशयितांना अटक छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नांदेड विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) ‘ऑपरेशन अमानत’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर (CPSN) रेल्वे स्थानकावर तत्पर कारवाई करत प्रवाशांच्या सुरक्षिततेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ११ एप्रिल रोजी रेल मदत (Rail Madad) द्वारे प्राप्त तक्रारीनुसार, मुंबई ते नाशिक प्रवासादरम्यान ट्रेन क्रमांक २०७०६ मध्ये प्रवासी प्रफुल बर्धिया यांचा सुमारे ₹२८,५०० किमतीचा मोबाईल फोन हरवला होता. तक्रार मिळताच RPF कर्मचारी राकेश कुमार शर्मा (हेड कॉन्स्टेबल) आणि फूल सिंह (कॉन्स्टेबल) यांनी तत्काळ कारवाई करून संबंधित गाडीतून मोबाईल सुरक्षितरित्या जप्त केला. आवश्यक पडताळणीनंतर हा मोबाईल प्रवाशांच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत RPF च...
नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, “नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो; मात्र योग्य काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे. आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.” नागरिकांनी घ्यावयाची काळजी पुरेसे पाणी प्या : तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्या, बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा. पेयांचा वापर : लिंबू सरबत, ताक, लस्सी, ORS यांसारख्या पेयांचे सेवन करा. योग्...
संविधानातील मूल्ये तळागाळापर्यंत रुजविणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन

संविधानातील मूल्ये तळागाळापर्यंत रुजविणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन

महाराष्ट्र
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रतिपादन नांदेड| प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करत मानवतेला मूलभूत अधिकार प्रदान केले. सामाजिक व आर्थिक समतेची मूल्ये रुजवतानाच स्त्री-पुरुष समानतेचा अधिकारही त्यांनी दिला. संविधानातील या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत करणे, हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, अमित राठोड, मयूरकुमार आंदेलवाड, प्रशांत थोरात, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, प...
ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात क्रांतिकारक निर्णय घ्या – डॉ. हंसराज वैद्य यांची मागणी

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात क्रांतिकारक निर्णय घ्या – डॉ. हंसराज वैद्य यांची मागणी

महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घ्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक फेडरेशन (फेस्कॉम) चे उत्तर मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ही मागणी व्यक्त केली. डॉ. वैद्य म्हणाले की, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा, दिल्ली व झारखंड या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस व कल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. मग सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्रात असे निर्णय का घेतले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित पुरोगामी राज्य आहे. मात्र प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या त...
नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान

शेती
डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येत आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना ‘मथुरा लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. हा सन्मान ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या 23 व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. नांदे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महाराष्ट्र
• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विचार समाजात पोहोचण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर कविता मुळे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अं...
error: Content is protected !!