बोंढार हवेली येथे भव्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन; नामांकित पैलवानांची दमदार हजेरी

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील बोंढार हवेली (जुने गाव) येथे श्री महारूद्र कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कुस्ती दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवानांनी सहभाग नोंदवला.

गुरू समगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजता कुस्ती दंगल रंगली. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 31 हजार रुपये, द्वितीय 21 हजार रुपये आणि तृतीय 11 हजार रुपये ठेवण्यात आले होते. एकूण सुमारे सात लाख रुपयांची बक्षिसांची जंगी उधळण करण्यात आली.

या कुस्ती दंगलीचे उद्घाटन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुवर्य समगीर महाराज यांच्यासह राज्यभरातील नामांकित पैलवानांची उपस्थिती होती. कुस्तीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध जिल्ह्यांतील क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पैलवान लक्ष्मण पाटील तिडके आणि पैलवान विठ्ठल पाटील मोरे यांनी योगदान दिले. तर कुस्ती निवेदक म्हणून पैलवान भालचंद्र रणशूर यांनी जबाबदारी सांभाळली. या यशस्वी आयोजनाबद्दल कुस्ती कमिटी, आयोजक बाळू पाटील तिडके तसेच ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!