महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 2026-27 प्रवेश प्रक्रिया जाहीर; प्रतिभावंत खेळाडूंना मोठी संधी

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 2026-27 प्रवेश प्रक्रिया जाहीर; प्रतिभावंत खेळाडूंना मोठी संधी

क्रीडा
नांदेड| राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्याच्या उद्देशाने शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीत सन 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, निवास, भोजन आणि आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व गडचिरोली या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हँडबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा १६ क्रीडा प्रकारांत प्रशिक्षण दिले जाते. प्रवेश प्रक्रिया ५० टक्के सरळ प्रवेश आणि ५० टक्के खेळनिहाय ...
माहूरगड विकासाला वेग; भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यावर भर – पालकमंत्री अतुल सावे

माहूरगड विकासाला वेग; भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यावर भर – पालकमंत्री अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरगड येथे सुरू असलेल्या विकासकामांना गती देत भाविकांसाठी दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. माहूर येथे आयोजित आढावा बैठकीत आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्र दोन्तुला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माहूर हे दररोज हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. भाविकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून अडचणी तातडीने सोडविल्या...
जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली; विकासाला गती देण्याचा संकल्प

जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली; विकासाला गती देण्याचा संकल्प

महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी आज पदभार स्वीकारला. माजी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकृतीवेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, प्रताप काळे, डॉ. अनंत गव्हाणे, दादासाहेब वानखेडे, सुषमा देसाई, मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, उपायुक्त सविता हरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवीन आयुक्त श्रीकांत यांनी विभागप्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती, सामाजिक व प्रशासकीय विषयांची माहिती घेतली. “समन्वयातून विकास साधूया,” असे आवाहन करत त्यांनी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला. छत्रपती संभाजीनगर विभाग हा सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून पर्यटनास चालना ...
पाणी आवर्तन तात्काळ सुरू करा; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

पाणी आवर्तन तात्काळ सुरू करा; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

शेती
नांदेड/हदगाव (प्रतिनिधी ) हदगांव तालुक्यातील तसेच हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर पाण्याअभावी संकट कोसळले असून, गुराढोरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हदगाव तहसीलदार तसेच उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे विभाग क्र. ४ यांना निवेदन देत पाण्याचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ चार दिवस पाणी सोडून नंतर पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. “धरणात पाणी असूनही आमच्या शेतात येत नाही,” अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. यावेळी निवेदन देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेल्यावर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. “कार्यालयात अधिकारी कधी येतात, कधी जातात याचा पत्ता नाही. संपूर्ण कारभार ‘रामभरोसे’ स...
प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

आरोग्य, शेती
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्र...
रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका वाढला

रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका वाढला

महाराष्ट्र
महावितरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात प्रवेश करणाऱ्या श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध तसेच दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माहितीनुसार, रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने विद्युत खांब न हटवता तसेच ठेवूनच काम पूर्ण केले. त्यामुळे सध्या रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूचे खांब रस्त्यात उभे राहिले असून, दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः मोठ्या वाहनांना वळण घेणे किंवा मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. https://www.youtube.com/shorts/t1DgtwO6Sts या खांबांमुळे अनेक वेळा अपघात घडले असून काही वाहनधारकांना गंभीर दुखापती तसेच...
उदगीरमध्ये 18-19 एप्रिलला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

उदगीरमध्ये 18-19 एप्रिलला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

महाराष्ट्र
देशभरातून 2500 पत्रकारांची उपस्थिती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती उदगीर| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18 व 19 एप्रिल 2026 रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून सुमारे 2500 पत्रकार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, राजेंद्र दर्डा उद्घाटन करतील. बाबासाहेब पाटील हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले तर सह-स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय बनसोडे कार्य पाहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एम. देशमुख तर अधिवेशनाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर असतील. 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. यापूर्वी शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार असून त्यात शाले...
नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील MGR गार्डन फंक्शन हॉल परिसराच्या पाठीमागील इस्लामपुरा भागात साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे दुपारच्या वेळी मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. कडाक्याच्या उन्हात खेळताना ही मुले देगलूर नाका परिसरातील नाल्याजवळ पोहोचली. येथे मनपामार्फत सुरू असलेल्या कामासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने खेळता खेळता ही मुले खड्ड्यात पडली आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज (वय 10), मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (वय 13), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय 13), आयान इब्राहिम बागवान (वय 11...
सन 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये अपघातात घट; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम

सन 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये अपघातात घट; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम

महाराष्ट्र, स्थानिक
नांदेड| परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रस्ते अपघात व मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मार्फत अतिवेग, मद्यपान करून वाहन चालविणे तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आरटीओच्या इंटरसेप्टर वाहनांवरील रडार कॅमेऱ्यांद्वारे भरधाव वेगाने वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील अपघातांपैकी सर्वाधिक अपघात सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तालुकानिहाय सखोल अभ्यास करण्यात आला. तालुकानिहाय सर्वेक्षण आणि विश्लेषण - फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत आरटीओच्या 32 अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांचे सर्वेक्षण केले. अपघातस्थळांचे Geo T...
फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

शेती
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. आयडीशिवाय खत वितरण केले जाणार नाही. रासायनिक खतांवरील शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. खतांचा काळाबाजार, साठेबाजी व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असून वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. डिजिटल नोंदणी प्रणाली - या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन, पीक व योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी क्रमांक किंव...
error: Content is protected !!