नांदेड हजूर साहिब–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ६ तास उशिराने सुटणार

नांदेड| येथून सुटणाऱ्या हजूर साहिब नांदेड हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07621 ही एक्सप्रेस 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:45 वाजता सुटण्याचे नियोजित होते. मात्र आता ही गाडी तब्बल 360 मिनिटे (6 तास) उशिराने म्हणजेच दुपारी 2:45 वाजता नांदेड स्थानकातून रवाना होणार आहे.

या विलंबामागचे कारण म्हणजे संबंधित लिंक ट्रेन क्रमांक 07702 ही एक्सप्रेस सुमारे 484 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मुख्य गाडीच्या वेळापत्रकावर झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुधारित वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!