
नांदेड| केंद्रीय विद्यालयाच्या वतीने पुणे येथे आयोजित विभागीय आर्चरी स्पर्धेत नांदेड येथील केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत नागरगोजे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.


मुंबई विभागाच्या केंद्रीय विद्यालयांतर्गत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील ही विभागीय स्पर्धा २२ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात अनिकेत ज्ञानोबा नागरगोजे याने अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.


अनिकेतने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल बोरीवाले यांना दिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय विद्यालय नांदेडचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, मुख्याध्यापक राम सर तसेच क्रीडा शिक्षक दीपक कुमार, प्रशांत सर आणि इतरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अनिकेतच्या या यशामुळे नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


