महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगर पेटणार? शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आमरण उपोषण : शुक्रवारी मार्केट बंद

हिमायतनगर पेटणार? शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आमरण उपोषण : शुक्रवारी मार्केट बंद

महाराष्ट्र
शुक्रवारी शहर बंदची हाक, प्रशासनावर संतापाचा स्फोट! हिमायतनगर (अनिल मादसवार) स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मुन्नाभाऊ उर्फ माधव शिंदे यांनी दिनांक 21 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे आहे. एव्हडंच नाहीतर यापूर्वी दिलेल्या आश्वासनांक...
नांदेड रेल्वे विभागात ‘जागतिक वारसा दिन’ उत्साहात साजरा

नांदेड रेल्वे विभागात ‘जागतिक वारसा दिन’ उत्साहात साजरा

महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदाच्या “आपत्ती व संघर्षाच्या परिस्थितीत जिवंत वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद” या जागतिक थीमनुसार विभागीय रेल्वे कार्यालय संकुल (DOC) येथील उद्यानात असलेल्या स्टीम क्रेन स्थळी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक वारसा वस्तूंचे विशेष प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले. या प्रदर्शनात DRM कार्यालय परिसरात जतन केलेला 35 टन क्षमतेचा स्टीम क्रेन, ZDM-4A डिझेल लोकोमोटिव्ह तसेच छत्रपती संभाजीनगर स्थानकावर संरक्षित ऐतिहासिक YP स्टी...
उन्हाळी गर्दीवर उपाय; हजूर साहिब नांदेड–आसनसोल दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू

उन्हाळी गर्दीवर उपाय; हजूर साहिब नांदेड–आसनसोल दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत हजूर साहिब नांदेड–आसनसोल विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 07701 ही विशेष गाडी दि. 21 एप्रिल 2026 रोजी हजूर साहिब नांदेड येथून रात्री 23:50 वाजता सुटेल आणि आसनसोल येथे गुरुवारी दुपारी 12:00 वाजता पोहोचेल. मार्गात पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, टाटानगर, चांदिल आणि पुरुलिया या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 07702 ही विशेष गाडी दि. 23 एप्रिल 2026 रोजी आसनसोल येथून दुपारी 14:00 वाजता सुटेल आणि शनिवारी पहाटे 00:45 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. परतीच्या मार्गातही ही गाडी पुरुलिया, चांदिल, टाटानगर, राऊरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर...
एसबीआय नांदेडमध्ये महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

एसबीआय नांदेडमध्ये महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र
नांदेड | भारतीय स्टेट बँक (एसबीआय) प्रशासकीय कार्यालय नांदेड तसेच एसबीआय अधिकारी, सेवा, कर्मचारी व ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील औद्योगिक शाखेत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक महाप्रबंधक मयंक चतुर्वेदी होते. प्रमुख वक्ते म्हणून यशवंत महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजय गव्हाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य प्रबंधक अनुप फाटे (मानव संसाधन), संघटनांचे पदाधिकारी सदाशिव चाळणेवाड, शिल्पा जिंतूरकर, उमेश आडगावकर, किरण कुमार जिंतूरकर, कपिल ढवळे, अतुल पखाण, राहुल खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रस्तावना शिल्...
हिमायतनगर तालुक्यात वादळ-वाऱ्यासह पावसाचा तडाखा; पिके व घरांचे मोठे नुकसान

हिमायतनगर तालुक्यात वादळ-वाऱ्यासह पावसाचा तडाखा; पिके व घरांचे मोठे नुकसान

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात रविवारी रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे व पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांतील घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (पश्चिम) परिसरात वादळाचा फटका अधिक बसला. गावातील अनेक कुटुंबांचे निवारे उद्ध्वस्त झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. यात हळद, उन्हाळी ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा,चिकू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मुक्या जनवारांसाठी जमून ठेवलेल वैरण देखील वादळी वाऱ्याने उडून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांवरील टिन पत्रे उडून गेल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहेत. काही ठिका...
हिमायतनगर रेल्वे स्थानक विकासावर प्रश्नचिन्ह; प्रवासी त्रस्त, प्रशासन मात्र उदासीन

हिमायतनगर रेल्वे स्थानक विकासावर प्रश्नचिन्ह; प्रवासी त्रस्त, प्रशासन मात्र उदासीन

तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. स्थानकावरील दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अद्याप डिजिटल कोच पोझिशन डिस्प्ले बसवलेले नाहीत. परिणामी, गाड्या नेमक्या कुठे थांबणार याची माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. https://www.youtube.com/shorts/X0AEtMA2f28 पहिल्या प्लॅटफॉर्मवर केवळ जुने बांधकाम रंगरंगोटी करून नव्यासारखे दाखवले जात आहे, तर प्रत्यक्षात दुरुस्तीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. छतामधून गळती होत असून एका बाजूला पाण्याची कमतरता तर दुसऱ्या बाजूला नळांमधून प...
पालकमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा; शेतकरी हित, आरोग्य सेवा व निधी वापरावर भर

पालकमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा; शेतकरी हित, आरोग्य सेवा व निधी वापरावर भर

शेती
नांदेड(प्रतिनिधी) जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, पाटबंधारे विभागाचे प्रकल्प तसेच जिल्हा नियोजन निधीच्या विनियोगाचा समावेश होता. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेतकरी हिताला प्राधान्य बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. शासनाचे धोरण शेतकरी हिताला प्राधान्य देणारे असून त्यांच्य...
20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात पुढील काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता असून, 20 ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, जोराचे वारे तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचा प्रभाव वाढणार असून, पुणे विभागासह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भातील अमरावती विभागातही काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, 22 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान,...
उन्हाळी गर्दीवर तोडगा; काकीनाडा–हिसार विशेष ‘TOD’ गाडीची घोषणा

उन्हाळी गर्दीवर तोडगा; काकीनाडा–हिसार विशेष ‘TOD’ गाडीची घोषणा

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळ्याच्या हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन–हिसार दरम्यान “Train on Demand (TOD)” विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. ही गाडी मुदखेड–नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला मार्गे धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक 07717 काकीनाडा टाउन–हिसार TOD विशेष गाडी 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 05.40 वाजता काकीनाडा टाउन येथून सुटेल. ही गाडी मुदखेड (22.15), नांदेड (23.10), पूर्णा (00.40), बसमत (01.10), हिंगोली (02.35), वाशिम (03.55), अकोला (05.45) मार्गे पुढे भुसावळ, वडोदरा, रतलाम व चित्तौडगड या प्रमुख स्थानकांवर थांबत गुरुवारी दुपारी 13.40 वाजता हिसार येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07718 हिसार–काकीनाडा टाउन TOD विशेष गाडी 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 14.10 वाजता हिसार येथून सुटून रविवारी 12.35 वाजता काक...
पशुपालकांसाठी मोठी संधी; ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’मधून ३ लाखांपर्यंत कर्ज

पशुपालकांसाठी मोठी संधी; ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’मधून ३ लाखांपर्यंत कर्ज

शेती
नांदेड| राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) योजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी ठरत आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळू शकते. दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढवता येते. तसेच आधीच KCC असलेल्या शेतकऱ्यांनाही पतमर्यादा वाढवून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला, तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३ टक्के व राज्य शासनाकडून ४ टक्के अशी एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. याशिवाय बँकांकडून २ टक्के सवलत मिळाल्यास प्रभावी व्याजदर शून्य टक्क्यां...
error: Content is protected !!