
नांदेड | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17 वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉकचा कालावधी वाढविण्यात आला असून, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.


या पार्श्वभूमीवर गाडी क्रमांक 11002 बल्लारशा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस ही दिनांक 26 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या कालावधीत दादर येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. म्हणजेच या कालावधीत ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत न जाता दादरपर्यंतच धावणार आहे.


हे पुनर्विकास काम Rail Land Development Authority मार्फत सुरू असून, प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत.


प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच या बदलामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


