फार्मर आयडी नोंदणीबाबत महत्त्वाचे आवाहन ; २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा

पुणे| राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.

राज्यातील एकूण १.७१ कोटी खातेदारांपैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अद्याप काही शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर (CSC) भेट देऊ शकतात किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित विभागाच्या हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

अजून नोंदणी केली नसेल तर काय करावे?

  • जवळच्या सेवा सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करा
  • किंवा ऑनलाइन ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून स्वतः नोंदणी करू शकता

फार्मर आयडी का आवश्यक आहे?

यापुढे खालील गोष्टींसाठी फार्मर आयडी गरजेचा असेल: सरकारी कृषी योजना, बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा, अनुदान आणि इतर लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!