महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लोहा तालुक्यात ५०० कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण

लोहा तालुक्यात ५०० कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण

महाराष्ट्र
लोहा| लोहा तालुक्यात जनगणनेच्या कामाला १६ मेपासून सुरुवात होणार असून यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली. पहिल्या टप्प्यात घरगणना केली जाणार असून प्रत्यक्ष कुटुंब सदस्यांची गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे. जनगणनेच्या कामासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पारडी (ता. लोहा) येथील सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये २७ एप्रिलपासून प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. हे प्रशिक्षण तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २७ ते २९ एप्रिल दरम्यान १५० कर्मचाऱ्यांसाठी, दुसरा टप्पा ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान (सुट्टी वगळून) १५० कर्मचाऱ्यांसाठी, तर तिसरा टप्पा ४ ते ६ मे दरम्यान २०० कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे. या प्रशिक्षणासाठी आठ प्रशिक्षक निय...
पूर्णा डिपोवर वॅगन तपासण्या वाढल्या; नांदेड रेल्वे विभागाची मालवाहतूक कार्यक्षमता मजबूत

पूर्णा डिपोवर वॅगन तपासण्या वाढल्या; नांदेड रेल्वे विभागाची मालवाहतूक कार्यक्षमता मजबूत

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागाने वित्तीय वर्ष 2025–26 मध्ये मालवाहतूक कार्यक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून पूर्णा रेल्वे डिपो येथे वॅगन तपासण्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार, 2024–25 मध्ये पूर्णा डिपोवर एकूण 248 वॅगन तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत 2025–26 मध्ये ही संख्या वाढून 282 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, प्रीमियम वॅगन तपासण्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी 55 प्रीमियम तपासण्या झाल्या होत्या, तर यावर्षी त्या तब्बल 158 पर्यंत वाढल्या आहेत. प्रीमियम तपासण्या ही जलद आणि सखोल तपासणी प्रक्रिया मानली जाते. यामुळे वॅगन कमी वेळात सेवेसाठी तयार होतात तसेच सुरक्षा व गुणवत्ता मानकेही उच्च पातळीवर राखली जातात. या सुधारणेमुळे मालगाड्यांचा टर्नअराउंड वेळ कमी होऊन एकूण मालवाहतूक व्यवस्थापन अधिक कार्...
जालना–नांदेड समृद्धी महामार्गग्रस्त १२ गावांतील शेतकऱ्यांची २५ एप्रिलला बाभुळगाव फाट्यावर निर्णायक बैठक

जालना–नांदेड समृद्धी महामार्गग्रस्त १२ गावांतील शेतकऱ्यांची २५ एप्रिलला बाभुळगाव फाट्यावर निर्णायक बैठक

महाराष्ट्र
नवीन नांदेड, प्रतिनिधी | जालना–नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे बाधित झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. २५ एप्रिल रोजी बाभुळगाव फाटा (ता. नांदेड) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीने दिली आहे. नांदेड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शासनाने अत्यंत कमी दराने जमीन घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागील चार वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शेतकरी पाठपुरावा करत असले तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, बागायती व शहरालगत असलेल्या सुपीक जमिनींचेही कवडीमोल दराने संपादन करण्यात आले. याशिवाय आता इंटरचेंज व इतर कामांसाठी पुन्हा संयुक्त मोजणीच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वा...
सरसम–दरेसरसम रस्त्यालगतच्या बॅरिकेट ठरताहेत जीवघेणा सापळा! ठेकेदाराच्या थातूर-मातूर कामावर नागरिकांचा संताप

सरसम–दरेसरसम रस्त्यालगतच्या बॅरिकेट ठरताहेत जीवघेणा सापळा! ठेकेदाराच्या थातूर-मातूर कामावर नागरिकांचा संताप

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | सरसम–दरेसरसम (ता. हिमायतनगर जि. नांदेड) येथील सरसम ते दरेसरसम दरम्यान नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी उघड झाल्या असून, रस्त्यालगत उभारलेले सिमेंट बॅरिकेट (काँक्रीट खांब) आता अपघातांचे निमंत्रण ठरत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील सरसम इंदिरानगर पासून दरे सरसम या गावाकडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याचे काम अनुकतेच करण्यात आले आहे. सदर काम करतांना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता उभारलेले हे सिमेंट कोंक्रेट बॅरिकेट वाहनधारकांसाठी जीवघेणा धोका निर्माण करत आहेत. रस्त्याच्या कडेला ना रिफ्लेक्टर, ना चेतावणी फलक...अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी हे पांढरे बॅरिकेट स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी, चालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी ठेकेदारा...
दिशा समिती बैठकीत जलजीवन मिशन, वीज व रस्ते विकासाचा आढावा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश

दिशा समिती बैठकीत जलजीवन मिशन, वीज व रस्ते विकासाचा आढावा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश

महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यातील विविध विकास योजना व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)ची बैठक उत्साहात पार पडली. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे ही बैठक झाली. बैठकीत खासदार अशोक चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, शिवाजी काळगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, लोहा व भोकर नगराध्यक्ष यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. त्यानंतर विविध योजनांचा सविस...
बोंढार हवेली येथे भव्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन; नामांकित पैलवानांची दमदार हजेरी

बोंढार हवेली येथे भव्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन; नामांकित पैलवानांची दमदार हजेरी

क्रीडा
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील बोंढार हवेली (जुने गाव) येथे श्री महारूद्र कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कुस्ती दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवानांनी सहभाग नोंदवला. गुरू समगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजता कुस्ती दंगल रंगली. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 31 हजार रुपये, द्वितीय 21 हजार रुपये आणि तृतीय 11 हजार रुपये ठेवण्यात आले होते. एकूण सुमारे सात लाख रुपयांची बक्षिसांची जंगी उधळण करण्यात आली. या कुस्ती दंगलीचे उद्घाटन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुवर्य समगीर महाराज यांच्यासह राज्यभरातील नामांकित पैलवानांची उपस्थि...
हडसणी फाट्यावर भीषण अपघात; ३ ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

हडसणी फाट्यावर भीषण अपघात; ३ ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र
संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील हडसणी फाटा येथे बुधवारी (22 एप्रिल) रात्री सुमारे 9 वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 केएन 2509 क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने हडसणी फाट्यावर दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. पहिल्या दुचाकीवरील रेखाबाई भाऊराव नरवाडे (42), त्यांचा मुलगा यशवंत नरवाडे (23) आणि नणंद अनुसया लोणाळे (43) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी भोकर येथील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,...
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

शेती
'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. 'एल-निनो'मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे का...
मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक झेप

मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक झेप

माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणारी मिनी ट्रॅक्टर योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व आवश्यक उपसाधने उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये ९० टक्के शासकीय अनुदान असून उर्वरित १० टक्के हिस्सा बचत गटांकडून दिला जातो. लाभाची रक्कम थेट गटांच्या आधार-संलग्न संयुक्त खात्यात जमा केली जाते. नांदेड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून, सन २०२३-२४ मध्ये १० तर २०२४-२५ मध्ये तब्बल ७३ बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे. आनंदनगर येथील राणी महिला बचत गट हा योजनेचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे. २०२४-२५ मध्ये निवड झाल्यानंतर या गटाला मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर ...
नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी नांदेड महापालिकेचा पुढाकार

नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी नांदेड महापालिकेचा पुढाकार

महाराष्ट्र
नांदेड| मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणपणाने लढलेल्या असंख्य योद्ध्यांच्या शौर्यकथा आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या ऐतिहासिक लढ्याची खरी ओळख आजच्या तरुणांना व्हावी, यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिका स्वतंत्र आणि व्यापक कार्यक्रम राबविणार असल्याची ठाम घोषणा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी केली. सीमाभागातील समन्वयकांशी आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना डोईफोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ एक इतिहासाचा भाग नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा पाया आहे. मात्र दुर्दैवाने आजच्या नव्या पिढीला या संग्रामाची सखोल माहिती नाही. हा लढा कसा लढला गेला, किती बलिदान दिले गेले आणि आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते कोणाच्या कष्टामुळे मिळाले—याची जाणीव निर्माण होणे अत्यावश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, दरवर्षी 17 सप्टेंबरला...
error: Content is protected !!