महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

भरधाव ट्रकची धडक; वऱ्हाडातील घोडीचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

भरधाव ट्रकची धडक; वऱ्हाडातील घोडीचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

महाराष्ट्र
हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील अंबाळा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने वऱ्हाडातील घोडीला दिलेल्या जोरदार धडकेत घोडीचा जागीच मृत्यू झाला असून, घोडी सांभाळणारा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाळा येथे विवाह सोहळ्यासाठी सजवलेली घोडी वऱ्हाडाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, घोडीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात घोडीची देखरेख करणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच चालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे नागरि...
पांदण रस्त्यासह विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना – तहसीलदार विठ्ठल परळीकर

पांदण रस्त्यासह विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना – तहसीलदार विठ्ठल परळीकर

शेती
लोहा/माळाकोळी| शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महास्वराज अभियानांतर्गत पांदण रस्त्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत असून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली. माळाकोळी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल (राजस्व) अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नायब तहसीलदार अशोक मोकले, श्री पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडे, उपअभियंता (पाणीपुरवठा) दीपक बनसोडे, ग्राम महसूल अधिकारी भुमेश्वर विभुते, कनिष्ठ अभियंता श्री कराड, सरपंच जनार्धन तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, गणपत तिडके, पांडुरंग नागरगोजे, हनमंतराव खेडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. परळीकर म्हणाले की, शेती, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकां...
नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा : अतुल सावे

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा : अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज व आधुनिक करण्यासाठी धावपट्टी विस्तारासह आवश्यक सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, विमानतळ संचालक अमरदीप सिंग सेहरा, संचालक व्यवस्थापक निलेश सोनटक्के आदी उपस्थित होते. सध्या नांदेड येथून सात ठिकाणी विमानसेवा सुरू असून लवकरच ती दहा ठिकाणी वाढविण्याचे नियोजन आहे. वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दोन ते तीन विमाने उतरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पर्यायी धावपट्टीसाठी आवश्यक जा...
ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर : अतुल सावे

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर : अतुल सावे

महाराष्ट्र
नांदेड| इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि बहुजन समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी केले. नांदेड येथील विष्णूनगर परिसरातील शंकरराव चव्हाण सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यात’ ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बाबुराव कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री सावे म्हणाले की, तळागाळातील घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. महामंडळांच्या माध्यमातून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगाराच्या सं...
हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

महाराष्ट्र, सामाजिक
लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणारी वामन पाटील यांची पोस्ट चर्चेत हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वॉर्डमध्ये अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आमदार-खासदार यांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करत “जनतेची सेवा करण्यासाठीच आपणास निवडून दिले आहे; कृपया जबाबदारीची जाणीव ठेवा,” अशी साद त्यांनी घातली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा ...
नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर

नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर

शेती
नांदेड | प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावत पहिल्या टप्प्यात तब्बल ८१३.९३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय, सूक्ष्मनियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, एकूण मंजुरी ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकरी या योजनेत विमाधारक असून, एकूण ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल झाले होते. सुमारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असून, ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असल्याची नोंद आहे. यासाठी ३३१२ पीक कापणी प्रयोग करण्यात आले आहेत. सध्या २१ महसूल मंडळांची रक्कम प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कापणी प्रयोगांची वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्य...
तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस सुरू; विदर्भ-माराठवाड्याला मोठा दिलासा

तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस सुरू; विदर्भ-माराठवाड्याला मोठा दिलासा

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे बोर्डाने गाडी क्रमांक 17429/17430 तिरुपती–अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. विद्यमान विशेष गाडीच्या ऐवजी ही सेवा आता नियमित साप्ताहिक स्वरूपात धावणार आहे. गाडी क्रमांक 17430 अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक रविवारी अकोला येथून सकाळी 08:10 वाजता सुटेल आणि सोमवार रोजी सकाळी 08:30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही सेवा 3 मे 2026 पासून सुरू होणार आहे. तर गाडी क्रमांक 17429 तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक शुक्रवारी तिरुपती येथून दुपारी 12:25 वाजता सुटून शनिवार रोजी दुपारी 02:00 वाजता अकोला येथे पोहोचेल. ही सेवा 8 मे 2026 पासून सुरू होणार आहे. या गाडीचे प्रमुख थांबे वाशिम, हिंगोली, बासमत, पूर्णा, हजूर साहेब नांदेड, धर्माबाद, बासर, काचिगुडा,...
तिरुपती यार्डमध्ये कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉक; काही गाड्यांच्या वेळेत बदल व मार्गांतर

तिरुपती यार्डमध्ये कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉक; काही गाड्यांच्या वेळेत बदल व मार्गांतर

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | तिरुपती यार्ड येथे ब्रिज क्रमांक 154 चे पाइप टाइपवरून बॉक्स टाइपमध्ये रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी 27 एप्रिल ते 2 मे 2026 दरम्यान प्रत्येकी 6 तासांचे ट्रॅफिक ब्लॉक मंजूर करण्यात आले आहेत. या कामामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07189 हजूर साहिब नांदेड – धर्मावरम एक्सप्रेस ही 1 मे 2026 रोजी हजूर साहिब नांदेड येथून तब्बल 6 तास उशिराने सुटणार आहे. तसेच, गाडी क्रमांक 07605 तिरुपती – अकोला एक्सप्रेस ही 1 मे 2026 रोजी तिरुपती – रेणिगुंटा – गुत्ती मार्गे वळविण्यात येणार आहे. मार्गांतरामुळे ही गाडी पाकाला, पिलेर, मदनपल्ले रोड, मुलकल्लाचेरुवू, कादिरी, धर्मावरम आणि अनंतपूर या स्थानकांवर थांबणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या तात्पुरत्या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्...
काकीनाडा–हिसार विशेष गाडीला मुदतवाढ; नांदेडमार्गे धावणार

काकीनाडा–हिसार विशेष गाडीला मुदतवाढ; नांदेडमार्गे धावणार

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन ते हिसार दरम्यान धावणाऱ्या “Train on Demand (TOD)” विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे. ही गाडी मुदखेड–नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला मार्गे धावणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी पाहता गाडी क्रमांक 07717 काकीनाडा टाउन–हिसार TOD विशेष गाडी 28 एप्रिल 2026 रोजी काकीनाडा टाउन स्थानकावरून सकाळी 5.40 वाजता सुटणार असून नांदेड (23.10), पूर्णा (00.40), बसमत (01.10), हिंगोली (02.35), वाशीम (03.55), अकोला (05.45) मार्गे पुढे भुसावळ, वडोदरा, रतलाम आणि चित्तौडगड या स्थानकांवरून प्रवास करत गुरुवारी दुपारी 1.40 वाजता हिसार येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07718 हिसार–काकीनाडा टाउन TOD विशेष गाडी 1 मे 2026 रोजी हिसार येथून दुपारी 2.10 वाजता सुटून रविवारी दुपारी 12.35 वाजता काकीनाडा टा...
नंदीग्राम एक्सप्रेस आता काही दिवस दादरपर्यंतच; CSMT पुनर्विकासामुळे बदल

नंदीग्राम एक्सप्रेस आता काही दिवस दादरपर्यंतच; CSMT पुनर्विकासामुळे बदल

महाराष्ट्र
नांदेड | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17 वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉकचा कालावधी वाढविण्यात आला असून, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर गाडी क्रमांक 11002 बल्लारशा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस ही दिनांक 26 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या कालावधीत दादर येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. म्हणजेच या कालावधीत ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत न जाता दादरपर्यंतच धावणार आहे. हे पुनर्विकास काम Rail Land Development Authority मार्फत सुरू असून, प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच या बदलामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल ...
error: Content is protected !!