धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

श्री गणेश महापुराण कथेत पोलीस निरीक्षक केंद्रे सहपरिवार सहभागी

श्री गणेश महापुराण कथेत पोलीस निरीक्षक केंद्रे सहपरिवार सहभागी

धर्म अध्यात्म
गणेश लीला, झांकी व भक्तिमय वातावरणाने हिमायतनगरकर भारावले काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने समारोप  हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय श्री गणेश महापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरही या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेत कथाश्रवणाचा लाभ घेतला. यावेळी श्री परमेश्वर मंदिर संस्थान कमेटीच्या वतीने पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा श्रींची प्रतिमा भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर यांच्या ओजस्वी वाणीतून सुरू असलेल्या श्री गणेश महापुराण कथेदरम्यान गणपती बाप्पांच्या विविध लीला आणि प्रसंग आकर्षक ...
देवस्थान इनाम कायदा स्थगित; मंदिर महासंघाच्या लढ्याला मोठे यश

देवस्थान इनाम कायदा स्थगित; मंदिर महासंघाच्या लढ्याला मोठे यश

धर्म अध्यात्म
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या निर्णयाचे स्वागत; मंदिर हिताच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका मुंबई,प्रतिनिधी| राज्यातील प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप २०२६’ कायदा स्थगित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे केली असून, या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिर समिती, विश्व हिंदू परिषद आणि राज्यभरातील मंदिर विश्वस्तांनी स्वागत केले आहे. मंदिरांच्या हक्कांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानले जात आहे. मंदिर विश्वस्तांच्या बैठका, निवेदने, हरकती, पत्रकार परिषद आणि देवस्थान भूमी संरक्षण परिषदांच्या माध्यमातून शासनापर्यंत मंदिरांची बाजू प्रभावीपणे पोहोचविण्यात आली होती. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा नि...
अद्वैत कॉलनीत श्रीमद्भागवत कथा महोत्सवाची भक्तिमय सांगता

अद्वैत कॉलनीत श्रीमद्भागवत कथा महोत्सवाची भक्तिमय सांगता

धर्म अध्यात्म
अधिक मासानिमित्त सात दिवसीय संगीतमय ज्ञानयज्ञाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर | अधिक मासानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील अद्वैत कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय संगीतमय श्रीमद्भागवत कथा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने सांगता झाली. श्री. धनंजय जोशी व जोशी परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या कथा महोत्सवाचे निरूपण भागवतकार स. भ. श्री. गणेश महाराज रामदासी यांनी आपल्या ओघवत्या वाणीने व संगीतमय शैलीत केले. कथेदरम्यान श्रीमद्भागवत महापुराणातील विविध प्रसंग, भगवान श्रीविष्णूंचे अवतार, भक्तीचे महत्त्व, संत परंपरा, धर्मसंस्कार आणि समाजजागृतीचे संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले. कथेच्या दुसऱ्या व चौथ्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे महत्त्व, विशेषतः वामन अवतार आणि भगवान श्रीकृष्ण जन्...
हिमायतनगरच्या रुक्मिणीनगरात भक्तिमय वातावरणात श्री सिद्ध हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न

हिमायतनगरच्या रुक्मिणीनगरात भक्तिमय वातावरणात श्री सिद्ध हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न

धर्म अध्यात्म
असंख्य भाविकांची उपस्थिती; महाप्रसादाचा घेतला लाभ हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील रुक्मिणीनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्ध हनुमान मंदिरात गुरुवार, दि. 14 रोजी भव्य हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सकाळी 9 वाजता वैदिक मंत्रोच्चारात होम-हवन विधी पार पडला. पुरोहित गजानन वाळके गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर, सचिव प्रा. कागणे सर, कापसे सर, विकास पाटील तसेच सुनील दमकोडवार यांनी सपत्नीक पूजा विधी करून धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला. श्री सिद्ध हनुमान मंदिरात गणपती, शिवलिंग, नंदी महादेव तसेच हनुमंतरायाच्या मूर्तींची विधिवत स्थापना करण्यात आली. या मंगल प्रसंगी शहरातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर “जय श्रीराम” आणि...
विश्व हिंदू परिषद – देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे उत्साहपूर्ण उद्घाटन

विश्व हिंदू परिषद – देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे उत्साहपूर्ण उद्घाटन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार| किनवट जिल्ह्यातील वाढोणा येथे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. गोमाता पूजनाने वर्गाची सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय दुर्गावाहिनी सहसंयोजिका पिंकीदिदी पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका द्रौपदी गायकवाड, परमपूजनीय संत केशवानंद स्वामी, डॉ. दिगंबर डोंगरगावकर, वर्ग अधिकारी राधाताई धडे, जिल्हाध्यक्ष शामजी रायेवार, पूर्णकालीन छायाताई कांगणे तसेच जिल्हा मातृशक्ती संयोजिका सुनिताताई भंडारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटन सत्रात पिंकीदिदी पवार यांनी “विश्व हिंदू परिषद स्थापना आणि विस्तार” या विषयावर मार्गदर्शन करताना हिंदू समाज संघटनाची आवश्यकता, मातृशक्तीची भूमिका तसे...
हिमायतनगरातील रुक्मिणीनगर येथे श्री सिद्ध हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

हिमायतनगरातील रुक्मिणीनगर येथे श्री सिद्ध हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

धर्म अध्यात्म
१४ मे रोजी होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील रुक्मिणीनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्ध हनुमान मंदिर येथे भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. मंदिर परिसरात सकाळी ६ ते ९ या वेळेत महोत्सव होम-हवन विधी पार पडणार असून, या धार्मिक विधीचे मार्गदर्शन श्री गजानन वाळके गुरु करणार आहेत. तसेच सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी रुक्मिणीनगर परिसरातील नागरिक, माता-भगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचि जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर तर सचिव प्रा. कागणे व सह मंदिर...
भक्ती, वेदघोष आणि आध्यात्मिक ऊर्जेचा दिव्य संगम; निकालपूरात प्रथम ब्रह्मोत्सवाची पर्वणी 

भक्ती, वेदघोष आणि आध्यात्मिक ऊर्जेचा दिव्य संगम; निकालपूरात प्रथम ब्रह्मोत्सवाची पर्वणी 

तेलंगणा, धर्म अध्यात्म
नंदीपेठ/निकालपूर, सादुल्ला नविनकुमार| ग्राम निकालपूर, मंडल डोणकेश्वर, जिल्हा निझामाबाद येथे श्री लक्ष्मी वेंकटेश्वर स्वामी यांच्या प्रथम वार्षिक ब्रह्मोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात दोन दिवसीय भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गाव सध्या भगव्या पताका, विद्युत रोषणाई आणि वेदघोषांनी दुमदुमून गेले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा दिव्य ब्रह्मोत्सव श्री वैष्णव संप्रदायाचे प्रचारक त्रिदंडी श्रीमन्नारायण चिन्न जियर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पल्लीगुट्टाचे मठाधीश्वर श्री बालयोगी रामलू महाराज यांच्या पावन उपस्थितीत संपन्न होणार आहे. शुक्रवार दि. 8 मे व शनिवार दि. 9 मे 2026 रोजी होणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, होम-हवन, विशेष पूजाअर्चा, भजन-कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रथम ब्रह्मोत्सवानिमित्...
कामारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; भीमगीत, अन्नदान व खीरदानातून मानवतेचा संदेश

कामारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; भीमगीत, अन्नदान व खीरदानातून मानवतेचा संदेश

धर्म अध्यात्म
हिमायतनगर| कामारी (ता. हिमायतनगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दि. २९ एप्रिल रोजी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दि. ३० एप्रिल रोजी भीमगीतांच्या सुरांनी गाव दुमदुमले, तर अन्नदानाच्या माध्यमातून मानवतेचा जिवंत संदेश देण्यात आला. भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ उत्तम नरवाडे, उपाध्यक्ष हर्षवर्धन भगवान शिंगणकर तसेच भीमगर्जना युवा मंचचे अध्यक्ष रोहितदादा नरवाडे व उपाध्यक्ष सुमेधभाऊ नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व भीमसैनिकांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी केला. यानंतर १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त खीरदानाचा उपक्रम राबवून बंधुता, समता आणि करुणेचा संदेश दिला. रखरखत्या उन्हातही महिनाभर अथक परिश्रम घेऊन हे उपक्रम राबवण्यात आले. काही ठिकाणी चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही....
हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

धर्म अध्यात्म
संगीतमय भागवत व गणेश पुराण कथेमुळे भक्तिमय वातावरण हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार)  तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर (वाढोणा) येथे पवित्र अधिकमास (धोंड्याचा महिना) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भव्य संगीतमय भागवत कथा ह.भ.प. वैष्णवी दिदी गोड सोनखेडकर यांच्या मधुर वाणीने दिनांक २३ मे ते २९ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे. यानंतर ३० मे रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात भव्य संगीतमय गणेश पुराण कथा ह.भ.प. सुनिल महाराज आष्टीकर (सेलू) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ जून ते ११ जून २०२६ दरम्यान दुपारी २ ते ५ या व...
हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ; खीरदान व भोजनदानाने धम्ममय वातावरण

हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ; खीरदान व भोजनदानाने धम्ममय वातावरण

धर्म अध्यात्म
हदगांव| तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि बुद्धमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिला मंडळाचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या वतीने पंचशील ध्वजारोहण आणि त्रिसरण पंचशीला घेण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पंचशील ध्वजाचे अनावरणकरण्यात आले. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना ग्रहण केली या सोहळ्यामध्ये महिला मंडळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व महिलांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून 'धम्म ज्योती बुद्धविहारा'कडे प्रयाण केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमयी झाले होते.वंदनेनंतर महिला मंडळाच्या वतीने उपस्थित नागरिकांना ख...
error: Content is protected !!