हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

संगीतमय भागवत व गणेश पुराण कथेमुळे भक्तिमय वातावरण

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार)  तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर (वाढोणा) येथे पवित्र अधिकमास (धोंड्याचा महिना) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भव्य संगीतमय भागवत कथा ह.भ.प. वैष्णवी दिदी गोड सोनखेडकर यांच्या मधुर वाणीने दिनांक २३ मे ते २९ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे. यानंतर ३० मे रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यात भव्य संगीतमय गणेश पुराण कथा ह.भ.प. सुनिल महाराज आष्टीकर (सेलू) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ जून ते ११ जून २०२६ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा समारोप १२ जून रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी (वाढोणा) यांच्या वतीने करण्यात आले असून, ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ तसेच संचालक मंडळ व ग्रामस्थांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक सोहळ्यांमुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होणार असून, भाविकांना अध्यात्मिक उन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!