कामारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; भीमगीत, अन्नदान व खीरदानातून मानवतेचा संदेश

हिमायतनगर| कामारी (ता. हिमायतनगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दि. २९ एप्रिल रोजी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त दि. ३० एप्रिल रोजी भीमगीतांच्या सुरांनी गाव दुमदुमले, तर अन्नदानाच्या माध्यमातून मानवतेचा जिवंत संदेश देण्यात आला. भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ उत्तम नरवाडे, उपाध्यक्ष हर्षवर्धन भगवान शिंगणकर तसेच भीमगर्जना युवा मंचचे अध्यक्ष रोहितदादा नरवाडे व उपाध्यक्ष सुमेधभाऊ नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व भीमसैनिकांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी केला.

यानंतर १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त खीरदानाचा उपक्रम राबवून बंधुता, समता आणि करुणेचा संदेश दिला. रखरखत्या उन्हातही महिनाभर अथक परिश्रम घेऊन हे उपक्रम राबवण्यात आले. काही ठिकाणी चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोगेंद्र कोंडबाराव नरवाडे (माजी सभापती, पंचायत समिती हिमायतनगर) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भीम टायगर सेनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्यासह विशाल भालेराव, जयकीन रावळे, अमोल रावळे, गौतम वठोरे, अनिल शेळके, सरपंच सौ. अंजनाबाई सोनुले, उपसरपंच अशोकराव शिरफुले, माजी सरपंच माधव शिरफुले, गणेश शिरफुले, दिगांबर शिरफुले, अमोल देवराये, अरविंद टाके, अरविंद तवर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!