धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पावसासाठी मारोती रायाला साकडे ; पळशीकर परिवारातर्फे हजारो नागरिकांना अन्नदान

पावसासाठी मारोती रायाला साकडे ; पळशीकर परिवारातर्फे हजारो नागरिकांना अन्नदान

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब हेरून वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी संदीप अप्पा पळशीकर परिवार व निलेश कोटगीरवार यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील अभिषेक ट्रेडिंग कंपनीसमोर अन्नदान पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी मारोती मंदिरात विधिवत पूजा-अर्चा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर अन्नदानाच्या पंगतीला सुरुवात झाली. या अन्नदानाचा हजारो नागरिक तसेच महामार्गावरून जाणाऱ्या महिला-पुरुष वाटसरूंनी लाभ घेतला. यावेळी रमेश अप्पा पळशीकर, प्रवीण जन्नावार, बाळूअण्णा चवरे, संतोष अप्पा पळशीकर, मारोतराव लुमदे पाटील, पुंडलिक यनगुलवार, रऊफ ताया, पतरूभाई, अफरोज भाई, संजय आचारी, आकाश ढोणे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अंकुश तवर, तानाजी सवणेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पावसासाठी श्रद्धेने आयोजित करण्यात...
तिरुपती लाडू देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील माहूरच्या प्रसिद्ध तांबुल मानांकन मिळालेला पहिलाच ‘प्रसाद

तिरुपती लाडू देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील माहूरच्या प्रसिद्ध तांबुल मानांकन मिळालेला पहिलाच ‘प्रसाद

धर्म अध्यात्म, तेलंगणा, महाराष्ट्र
'जीआय टॅग'; इतिहास, संस्कृती व परंपरेची जपणूक ' मंदिरात दररोज महाप्रसादाचे होतेय वाटप... श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील 'विडा तांबुल' या प्रसादाला अखेर बहुमानाचा भौगोलिक मानांकन ('जीआय टॅग') मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चेन्नई येथील 'जिओग्राफिकल इंडिकेशन्स' रजिस्ट्रीने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. भारतात यापूर्वी केवळ तिरुपतीच्या लाडूला प्रसादाच्या स्वरूपात 'जीआय टॅग' मिळाला होता. त्यानंतर हा बहुमान मिळवणारा माहूरचा तांबुल हा देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद ठरला आहे. माहूरगड श्री रेणुका मातेचा पानाच विडा तांबुल हा मुख्यप्रसाद आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्या ठिकाणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्...
माऊली मित्र मंडळाकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा

माऊली मित्र मंडळाकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा

धर्म अध्यात्म
महाप्रसाद, औषधोपचार आणि चरणसेवेसह यंदा मसाज सेवेचीही सुविधा हिमायतनगर, जांबुवंत मीराशे| पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी माऊली मित्र मंडळ, नांदेड यांच्या वतीने गेल्या अकरा वर्षांपासून सेवाकार्य सुरू आहे. फलटणजवळील काळज येथे यंदाही वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, मेडिकल औषधोपचार, चरणसेवा तसेच विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना आराम मिळावा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, या उद्देशाने यंदा विशेषतः मसाज सेवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा सेवाकार्याचा उपक्रम सलग तीन दिवस सुरू राहणार आहे. गेल्या अकरा वर्षांपासून माऊली मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा केली जात असून, मंडळाच्या या उपक्रमाचे वारकरी आणि भाविकांकडून कौतुक होत आहे. या सेवाकार्यात डॉ. गोनेवार, व...
सिडको मोढा प्रकल्पातील श्री अष्टविनायक गणपती मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. आनंद पाटील बोंढारकर

सिडको मोढा प्रकल्पातील श्री अष्टविनायक गणपती मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. आनंद पाटील बोंढारकर

धर्म अध्यात्म
मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीट रस्ता आमदार निधीतून; गणपती नगर नामफलकाचे अनावरण नवीन नांदेड | सिडको मोढा प्रकल्पातील श्री अष्टविनायक गणपती मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, मंदिराकडे जाणारा मुख्य सिमेंट काँक्रीट रस्ता लवकरच आमदार निधीतून करण्यात येईल, असे आश्वासन आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिले. रविवारी (१२ जुलै) सिडको मोढा प्रकल्पातील आरके-एमके परिसरातील श्री अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान येथे आयोजित 'गणपती नगर' नामफलक अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ. बोंढारकर यांच्या हस्ते गणपती नगर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला साई हिरो होंडाचे संचालक दिलीप भाऊ भगिले, मोरे पाटील, खराणे पाटील, गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. बोंढारकर यांनी मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी...
वीरशैव लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यतेसाठी प्रयत्न; उदगीरच्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार

वीरशैव लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यतेसाठी प्रयत्न; उदगीरच्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार

धर्म अध्यात्म
नांदेड | वीरशैव लिंगायत समाजाला देशातील सातवा स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता मिळावी, यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केदारपीठाचे जगद्गुरू रावल विद्याविभूषित श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग महास्वामीजी यांनी दिली. या संदर्भात उदगीर येथे २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम भूमिका निश्चित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. नांदेडमधील आनंदनगर परिसरातील श्री केदारेश्वर सत्संग भवन येथे आयोजित व्यापक बैठकीत ते धर्मोपदेश करताना बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र व तेलंगणातील २५ हून अधिक मठाधिपती, भाजपचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे तसेच वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरूंनी सांगितले की, वीरशैव लिंगायत सम...
७०० वर्षांची परंपरा, विठ्ठलनामाचा गजर; संत साधू महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना!

७०० वर्षांची परंपरा, विठ्ठलनामाचा गजर; संत साधू महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना!

धर्म अध्यात्म
चांदीच्या पालखीचे प्रथम दर्शन; टाळ-मृदंगाच्या गजरात कंधार नगरी भक्तिमय कंधार,सचिन मोरे| "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी"च्या अखंड जयघोषात कंधार नगरी बुधवारी दुपारी अक्षरशः विठ्ठलमय झाली. मराठवाड्याच्या संत परंपरेचा अभिमान असलेल्या श्री संत साधू महाराज संस्थानच्या ७०० वर्षांच्या अखंड वारी परंपरेतील पायी दिंडीचे आज भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. हजारो वारकरी, महिला, युवक आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण कंधार नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. यंदाच्या दिंडीचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ती प्रथमच सहभागी झालेली भव्य चांदीची पालखी आणि नवीन चांदीचा रथ. फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेल्या पालखीत विराजमान झालेल्या संत साधू महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पालखी मार्गक्रमण करत असताना टाळ-मृदंगाचा गजर, हरिपाठ, अभंग आणि विठ्ठलनामाने वातावरण ...
संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव; पंढरपूर पायी वारीसाठी विजय चव्हाण यांचा सत्कार

संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव; पंढरपूर पायी वारीसाठी विजय चव्हाण यांचा सत्कार

धर्म अध्यात्म
नांदेड | भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पार पडला. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पायी वारीसाठी प्रस्थान करणारे शाळेचे वरिष्ठ लिपिक विजय चव्हाण यांचा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. सुमठाणकर यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शिक्षक व कर्मचारी स्वतःच्या आचरणातून संस्कृतीचे संवाहक बनले, तर विद्यार्थ्यांमध्येही चांगले संस्कार आपोआप रुजतात, असे ते म्हणाले. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी, परंपरा आणि अध्यात्म यांची जोपासना देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा विधायक उपक्रमांमध्ये सह...
२७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी; पर्यावरण संवर्धनासह अमरनाथ यात्रेच्या यशासाठी प्रार्थना

२७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी; पर्यावरण संवर्धनासह अमरनाथ यात्रेच्या यशासाठी प्रार्थना

धर्म अध्यात्म
नांदेड | मराठवाड्यात यंदा भरपूर पाऊस पडावा, जलसाठे भरावेत, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी (दि. २८ जून) सकाळी ६ वाजता जी. जी. रोडवरील बालाजी मंदिर येथून उत्साहात प्रस्थान करणार आहे. अमरनाथ यात्री संघ, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार अमरनाथ राजूरकर, संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, डी. पी. सावंत, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे तसेच इतर मान्यवरांचे मार्गद...
पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर तालुका महिला अध्यक्षपदी मुक्ताताई बनसोडे यांची नियुक्ती

पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर तालुका महिला अध्यक्षपदी मुक्ताताई बनसोडे यांची नियुक्ती

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| पारंपारिक लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने सौ. मुक्ताताई पांडुरंग बनसोडे यांची हिमायतनगर तालुका महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे (कामारीकर) यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष शाहीर रमेश नार्लेवाड हाळदेकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ हे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात कार्यरत असून लोककलावंतांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील सौ. मुक्ताताई बनसोडे यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील लोककलावंतांचे संघटन मजब...
सहस्रकुंड बाणगंगा येथे भव्य शिवपुराण कथा महोत्सव; २९ जूनपासून भक्तिमय पर्वाला सुरुवात

सहस्रकुंड बाणगंगा येथे भव्य शिवपुराण कथा महोत्सव; २९ जूनपासून भक्तिमय पर्वाला सुरुवात

धर्म अध्यात्म
परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून भगवान महादेवांच्या दिव्य महिमेचे वर्णन हिमायतनगर, अनिल मादसवार| किनवट -हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर देवस्थान येथे येत्या 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत भव्य संगीतमय शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून भगवान महादेवांच्या दिव्य महिमेचे रसाळ व भक्तिमय निरूपण होणार असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत भव्य संगीतमय शिवपुराण कथा दररोज दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या चालणार असून, कथेनंतर दररोज महाप्रसाद वितरण होईल. दिनांक 6 जुलै रोजी काल्याच कीर्तन होऊन भव्य महाप्रसादाने कथा महोत्सवाचा समारोप होणार आहे. भगवान श...
error: Content is protected !!