पदोन्नतीनंतर श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक; सौ. पल्लवीताई टेमकर यांनी घेतले श्रींचे दर्शन

हिमायतनगर, अनिल मादसवार| उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर हिमायतनगरच्या तहसीलदार तथा श्री परमेश्वर मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ. पल्लवीताई टेमकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 21ऑगस्ट रोजी भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी श्री परमेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेत त्यांनी मंदिरात प्रार्थना केली.

 

यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक वामनराव बनसोडे, ॲड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, श्याम जक्कलवाड, गजानन हरडफकर, मायंबा होळकर, प्रवीण कोमावार, रामभाऊ सूर्यवंशी, दशरथ गोसलवाड, पंडित ढोणे आदींसह मंदिर कमिटीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

oplus_2097152

पदोन्नतीनंतर मंदिरात झालेल्या या भेटीप्रसंगी उपस्थितांनी सौ. पल्लवीताई टेमकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या नवीन प्रशासकीय जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री परमेश्वर महाराजांच्या कृपेने त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, अशी भावना व्यक्त करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!