
नगरसेविका दर्शना शरद चायल यांनी घेतले मनोभावे दर्शन; शहर-तालुक्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची केली प्रार्थना


हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| अंगारिका चतुर्थीनिमित्त हिमायतनगर येथील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या श्री वरदविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी श्री वरदविनायकाचे दर्शन घेतले.


यावेळी हिमायतनगर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १च्या नगरसेविका सौ. दर्शना शरद चायल यांनी श्री वरदविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सर्व मायबाप जनतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.


अंगारिका चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ राहिली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.


