देगलूर ते करडखेड भव्य पदयात्रेचे आयोजन

१४व्या वर्षात अखंड भक्तीची परंपरा; शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

देगलूर, गंगाधर मठवाले| श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही देगलूर ते करडखेड या मार्गावर भव्य शिवभक्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड भक्तीची परंपरा जपत ही पदयात्रा यंदा १४व्या वर्षात पदार्पण करत आहे.

ही पवित्र पदयात्रा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता बंडयाप्पा मठस्थान, गांधी चौक, देगलूर येथून प्रारंभ होणार आहे. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात शिवभक्त या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

दरवर्षी या पदयात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजक संतोष पाटील यांनी केले आहे.

‘हर हर महादेव’, ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषात निघणाऱ्या या पदयात्रेमुळे देगलूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. शिवभक्तांनी वेळेपूर्वी उपस्थित राहून पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!