तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस सुरू; विदर्भ-माराठवाड्याला मोठा दिलासा
नांदेड | महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे बोर्डाने गाडी क्रमांक 17429/17430 तिरुपती–अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. विद्यमान विशेष गाडीच्या ऐवजी ही सेवा आता नियमित साप्ताहिक स्वरूपात धावणार आहे.
गाडी क्रमांक 17430 अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक रविवारी अकोला येथून सकाळी 08:10 वाजता सुटेल आणि सोमवार रोजी सकाळी 08:30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही सेवा 3 मे 2026 पासून सुरू होणार आहे.
तर गाडी क्रमांक 17429 तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक शुक्रवारी तिरुपती येथून दुपारी 12:25 वाजता सुटून शनिवार रोजी दुपारी 02:00 वाजता अकोला येथे पोहोचेल. ही सेवा 8 मे 2026 पासून सुरू होणार आहे. या गाडीचे प्रमुख थांबे वाशिम, हिंगोली, बासमत, पूर्णा, हजूर साहेब नांदेड, धर्माबाद, बासर, काचिगुडा,...








