हिमायतनगर रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या उंबरठ्यावर; मात्र प्रवासी सुविधांतील त्रुटींमुळे नाराजी

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उद्घाटनाची तारीखही जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्थानकावरील विविध विकासकामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून, उद्घाटनापूर्वीच अपूर्ण सुविधा पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

सध्या रेल्वे स्थानक परिसरात विद्युत रोषणाईसह सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकावर ऍडव्हर्टीसिंग एलईडी टीव्ही, दोन नंबर प्लॅटफॉर्मवरील डिजिटल कोच डिस्प्ले, आरपीएफ अथवा जीआरपीएफ पोलीस चौकी, पार्सल कार्यालय, धनबाद एक्सप्रेसला थांबा, बंद झालेली काझीपेठ एक्सप्रेस चालू करावी.

हिमायतनगर शहराला तीर्थ क्षेत्र शहर दर्जा मिळालेला असल्याने कामानिवार श्री परमेश्वर मूर्ती बसवावी, स्थानकाला हिमायतनगर (वाढोणा) असे नामःफलक करावे, प्रवाश्यासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दोन नंबर प्लॅटफॉर्मवर सुलभ शौचालय, वेटिंग हॉल तसेच प्रवासी वाहनांसाठी पार्किंग शेड यांसारख्या सुविधांचा अभाव असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

oplus_16

तसेच झालेल्या काही विकासकामांमध्येही अनेक त्रुटी दिसून येत असल्याने उद्घाटनापूर्वीच सर्व कामांची गुणवत्ता तपासून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे. रेल्वे स्थानक उद्घाटनासाठी सज्ज असले तरी प्रवाशांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून हिमायतनगर रेल्वे स्थानक खऱ्या अर्थाने प्रवासी हिताचे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!