क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर तीन संशयित चोरट्यांना अटक

ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर तीन संशयित चोरट्यांना अटक

क्राइम
परभणी/नांदेड | प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF) नांदेड विभागाने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर विशेष कारवाई करत प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे प्रवाशांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या विशेष देखरेखी दरम्यान आरपीएफचे एएसआय अमोल वावळे यांनी ९ आणि १० जून २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानकावर ‘थीफ्ट ऑफ पॅसेंजर बिलाँगिंग्स’ (ToPB) प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. पहिली कारवाई ९ जून रोजी दुपारी १:५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर करण्यात आली. ट्रेन क्रमांक ५७६५२ मनमाड–हजूर साहिब नांदेड एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान किरण (वय २५, रा. बीड) हा संशयित जनरल डब्य...
हदगाव बस स्थानकात भीषण अपघात; एसटी बसची धडक लागून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

हदगाव बस स्थानकात भीषण अपघात; एसटी बसची धडक लागून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

क्राइम
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील बस स्थानकात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उत्तम आबाजी वाघमारे (वय ७०, रा. पेवा, ता. हदगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम वाघमारे हे आपल्या गावाकडे जाण्यासाठी हदगाव बस स्थानकात आले होते. यावेळी भंडारा–औसा एसटी बस (क्रमांक MH 14 MH 2740) स्थानकात प्रवेश करत असताना, ते बसच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर अपघात झाला. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. संबंधित एसटी बस हदगाव पोली...
सरसम–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सरसम–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

क्राइम
हिमायतनगर | सरसम ते हिमायतनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर नामेवार व लक्षटवार हे सरसम येथून हदगाव तालुक्यातील वाळकी व तामसा गावाकडे मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी समोरून वाळकेवाडी येथील क्षीरसागर लक्ष्मणराव हे ऑटो घेऊन येत असताना रस्त्यावरील भेगांमध्ये दुचाकी अडकल्याने मोटारसायकल घसरली व थेट ऑटोला जाऊन धडकली. या भीषण अपघातात गंगाधर नामेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोचालक क्षीरसागर लक्ष्मणराव व दुचाकीवरील लक्षटवार हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सरसम येथील नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमींना प्र...
पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्ड्यांवर धडक कारवाई

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्ड्यांवर धडक कारवाई

क्राइम
15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल; 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त लातूर | नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जुगार व मटका अड्ड्यांवर धाडी टाकून एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 5 जून 2026 रोजी निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात सुरू असलेल्या दोन मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 24 हजार 320 रुपयांची रोकड, 43 हजार रुपयांचे सहा मोबाईल फोन आणि 48 हजार 600 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1 लाख 15 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्...
मरडगा येथे शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मरडगा येथे शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम
महसूल अधिकाऱ्यांसमोरच काठी, दगड व पाईपने मारहाण; पाच वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या वादाला हिंसक वळण हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्यातील मरडगा येथे शेतातील रस्त्याच्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय शेतकऱ्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काठी, दगड, पाईप व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी तब्बल १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २६ मे २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मरडगा येथे घडली. या प्रकरणातील फिर्यादी संभाजी किशनराव चौतमल (वय ५५) हे आपल्या शेतात असताना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौतमल आणि शेजारील काळे कुटुंबीय यांच्यात शेतातील रस्त्यावरून गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू आहे. संबंधित रस्त्याची पाहणी करण्यासाठी दि. २...
नांदेड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका; गुटखा, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांसह लाखोंचा साठा जप्त

नांदेड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका; गुटखा, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांसह लाखोंचा साठा जप्त

क्राइम
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर विशेष मोहीम; प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर कारवाई, अनेक दुकाने सील नांदेड | सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई मोहीम राबवत गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य अन्नसाठ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मागील आठवडाभर चाललेल्या या विशेष मोहिमेत लाखो रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गोपनीय माहिती आणि नियमित तपासणीच्या आधारे जिल्ह्यात विविध भागांत अचानक छापे टाकण्यात आले. दि. २९ मे रोजी नांदेडच्या जुना मोंढा परिसरातील एम. ए. शरीफ या आस्थापनाची तप...
निवघ्यात जुगार अड्ड्यावर रक्तरंजित संघर्ष; तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू

निवघ्यात जुगार अड्ड्यावर रक्तरंजित संघर्ष; तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू

क्राइम
दोन गटांत वादातून हाणामारी; मित्राला वाचवताना विजय कदम यांचा दुर्दैवी अंत, एक जण गंभीर जखमी हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील निवघा (बा.) येथे जुगार अड्ड्यावर दोन गटांत झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३१ मे) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध जुगार अड्ड्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव विजय नारायण कदम (वय २५) असे असून तो उमरजखेड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर या घटनेत रामा गजभारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शाहिद पठाण अब्दुल खुद्दूस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय कदम आणि रामा गजभारे हे दोघे निवघा येथील कथित जुगार अड्ड्यावर...
एसबीआयच्या लॉकरमधून ८० तोळे सोने गायब; ग्राहकांचा विश्वास तुटला

एसबीआयच्या लॉकरमधून ८० तोळे सोने गायब; ग्राहकांचा विश्वास तुटला

क्राइम
नांदेडच्या डॉक्टर लेन शाखेत धक्कादायक घोटाळा; एक अधिकारी अटकेत, दुसरा फरार नांदेड | देशातील सर्वात विश्वासार्ह बँकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदेड येथील डॉक्टर लेन शाखेत ग्राहकांचा विश्वास डळमळीत करणारा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. कर्जासाठी तारण ठेवलेले तब्बल ८० तोळे सोने दोन बँक अधिकाऱ्यांनी संगनमताने लंपास केल्याचा आरोप समोर आला असून, या घटनेने ग्राहकांसह शहरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार लपवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लॉकर मधील खरे सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यामुळे बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि अंतर्गत नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर लेन शाखेत कर्जासाठी तारण ठेवण्यात आलेल्या सोन्यापैकी ८ ग्राहकांचे ३९१.६० ग्रॅम सोने...
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा ‘जनसंवाद’; नांदेडमध्ये ३७ तक्रारदारांशी साधला थेट संवाद

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा ‘जनसंवाद’; नांदेडमध्ये ३७ तक्रारदारांशी साधला थेट संवाद

क्राइम
तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश; ‘संवेदना’ पोर्टलद्वारे पुढील कार्यवाही नांदेड | नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे तसेच पोलीस–नागरिक संवाद अधिक बळकट करून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट पोलीस उप महानिरीक्षकांसमोर आपली व्यथा मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या पोलीस कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक नियमितपणे जिल्हा मुख्यालयांना भेट देत असून, याच पार्श्वभूमीवर दि. ३० मे रोजी नांदेड येथे जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२.३० ते २.३० या...
ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार.! कंधार – मुखेड रोडवरील दुर्दैवी घटना

ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार.! कंधार – मुखेड रोडवरील दुर्दैवी घटना

क्राइम
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील कंधार - मुखेड रोडवर अंबुलगा येथील (दांडाचा महादेव) येथे रोडवरून जाणारा स्वराज ७४४ कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर हेड हा दि.२८ मे रोज गुरुवारी दुपारी ३:०० च्या सुमारास पलटी होऊन चालक बालाजी गोविंद कदम रा. हिप्परगा (शहा) ता.कंधार जि.नांदेड यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि २८ मे रोज गुरुवारी कंधार - मुखेड रोड वरून ट्रॅक्टर हेड हे कुठेतरी शेत मशागत कामासाठी जात असताना कंधार तालुक्यातील अंबुलगा - सावरगाव (नि.) येथे दुपारी ३:०० च्या सुमारास चालकाच्या हलगर्जीपणामुळे व वाढत्या वेगामुळे ट्रॅक्टरवरील ताबा सुटून सदरचा ट्रॅक्टर हेड हा पलटी होऊन, चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली. घटनेचे वृत्त कळताच कंधार पोलिसांनी तात्काळ घटन...
error: Content is protected !!