“मी आहे तोपर्यंत कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही” – पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “मी हिमायतनगरमध्ये कार्यरत असताना कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही. संपूर्ण तालुका व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांचा निर्धार आहे,” असा ठाम विश्वास हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी व्यक्त केला.

हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात व्यसनमुक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आतापर्यंत तालुक्यातील सुमारे २७ गावांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना दारू, तंबाखू, बीडी, सिगारेट तसेच इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यांस मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या मोहिमेत पोलीस विभागासोबत पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामस्थ तसेच पत्रकार सक्रिय सहभाग घेत असून, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्व स्तरातून सहकार्य मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, युवकांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला जात आहे.

तालुक्यातील प्रत्येक गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत, नागरिकांनीही या सामाजिक मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!