राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पीक कर्ज वसुलीसाठी सक्ती करू नका; खासदार नागेश पाटील आष्टिकर यांचे बँकेला निर्देश

पीक कर्ज वसुलीसाठी सक्ती करू नका; खासदार नागेश पाटील आष्टिकर यांचे बँकेला निर्देश

राजकारण
हदगाव | पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टिकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हदगाव शाखेला दिल्या आहेत. दि. 28 एप्रिल 2026 रोजी शाखा व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात खासदार आष्टिकर यांनी नमूद केले आहे की, बँकेचे काही कर्मचारी खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्यांकडून कर्ज भरण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शासनामार्फत पीक कर्जमाफी जाहीर असताना अशा प्रकारे सक्ती करणे अन्यायकारक असून शेतकऱ्यांवर मानसिक व सामाजिक ताण निर्माण होत आहे. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना वारंवार त्रास देणे, दमदाटी करणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना तात्काळ आळा घालावा आणि बँक कर्मचाऱ्यांमार्फत कोणत्याही प्रकारची सक्ती ...
नगरपंचायतीकडे नागरिकांच्या हक्कासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन; मालमत्ता नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

नगरपंचायतीकडे नागरिकांच्या हक्कासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन; मालमत्ता नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

राजकारण
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 10 मधील नागरिकांच्या मालमत्ता नोंदणीच्या प्रश्नावर भाजपचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी नगरपंचायतीकडे निवेदन देत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या निवेदनामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल असा ठाम विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला आहे आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाका गल्ली व बजरंग चौक परिसरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित जागेवर वास्तव्यास असूनही त्यांच्या मालमत्तेची नोंद नगरपंचायतीच्या अभिलेखात नमुना 43 मध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात पुढ...
कृषी विक्री केंद्र बंदप्रकरणी ठाकरे सेनेचा आक्षेप; प्रशासनाकडून फेडरेशनला नोटीस

कृषी विक्री केंद्र बंदप्रकरणी ठाकरे सेनेचा आक्षेप; प्रशासनाकडून फेडरेशनला नोटीस

राजकारण
नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या कृषी विक्री केंद्र बंदप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संबंधित फेडरेशनला नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत खत व बियाण्यांच्या लिंकिंग पद्धतीविरोधात स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. शेतकऱ्यांना जबरदस्तीने लिंकिंगद्वारे खत व बियाणे विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, या निर्देशांकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र फर्टीलायझर्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनने कृषी विक्री केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत बंदला बेकायदेशीर ठरवले आहे. “रब्बी हंगामाच्या त...
लोहा–कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर

लोहा–कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर

राजकारण, शेती
नांदेड | खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या लोहा–कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 134 कोटी 58 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मंजुरीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली होती, तर काही भागात जमिनीही वाहून गेल्याचे चित्र होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार चिखलीकर यांनी थेट राज्य शासनाकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार चिखलीकर यांनी आभार व्यक्त केले. ...
हदगावात सामूहिक विवाह ; २९ जोडपी अडकली विवाहबंधनात, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

हदगावात सामूहिक विवाह ; २९ जोडपी अडकली विवाहबंधनात, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव येथे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा वाढता भार कमी करणे आणि साधेपणातून सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढवणे हा होता. या प्रसंगी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “सामूहिक विवाहासारखे उपक्रम समाजासाठी आदर्श निर्माण करणारे आहेत. अशा माध्यमातून गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळतो.” या सोहळ्यात एकूण २...
हदगावात रविवारी भव्य सामूहिक विवाह सोहळा; मोठ्या उपस्थितीचे आ. बाबूराव कदम कोहळीकर यांचे आवाहन

हदगावात रविवारी भव्य सामूहिक विवाह सोहळा; मोठ्या उपस्थितीचे आ. बाबूराव कदम कोहळीकर यांचे आवाहन

राजकारण
हदगाव,गौतम वाठोरे| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव येथे रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा भार कमी करणे आणि सामाजिक ऐक्य व साधेपणाचा आदर्श निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिवसेना (युती) तर्फे आयोजित या सोहळ्याचे प्रमुख आयोजक हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर आहेत. तामसा रोडवरील रामलीला मैदान येथे दुपारी १ वाजून ०१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या उपक्रमाद्वारे केवळ खर्चात बचत नाही, तर समाजात बंधुभाव, एकात्मता आणि साधेपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. “समाजातील कुटुंबांना आधार मिळावा आणि साध्या पद्धतीने विवाह लावून एक आदर्श निर्माण व्हावा,” या भावनेतून श...
आ. बाबूराव कदम कोहळीकरांचा शब्दपूर्तीचा मान; हरडफ–देवसरी रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

आ. बाबूराव कदम कोहळीकरांचा शब्दपूर्तीचा मान; हरडफ–देवसरी रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिलेला शब्द पाळत हरडफ–देवसरी या महत्त्वाच्या रस्त्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी युवानेते शरद कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गावातील रस्त्याची दुरवस्था, नागरिकांची गैरसोय याकडे त्यांनी वारंवार आमदारांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून विकासकामांना गती मिळाली आहे. हरडफ ते देवसरी हा रस्ता विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या रस्त्यामुळे दोन्ही विभागांतील नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. केवळ निधी मंजूर करून न थांबता, आमदारांनी काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असून सध्या काम युद्धपातळ...
नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारचा नकार; खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र नाराजी

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारचा नकार; खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र नाराजी

राजकारण
नांदेड| महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाबाबत धक्कादायक घडामोड समोर आली आहे. प्रकल्पातील आपल्या वाट्याचा ५० टक्के खर्च उचलण्यास कर्नाटक सरकारने नकार दिल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ही भूमिका दोन्ही राज्यांतील जनतेच्या अपेक्षांना धक्का देणारी असल्याची टीका केली. नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ‘दिशा’ बैठकीत रेल्वे विभागाच्या अहवालातून ही बाब उघड झाली. महाराष्ट्र सरकारने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकल्पासाठी आपल्या वाट्याचा ५० टक्के खर्च उचलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, २७ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक सरकारने या खर्चातील सहभागाबाबत अनिच्छा दर्शविल्याचे स्पष्ट झाले...
महिला विरोधी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचे ‘जनआक्रोश आंदोलन

महिला विरोधी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचे ‘जनआक्रोश आंदोलन

राजकारण
आ.श्रीजया चव्हाण व महानगराध्यक्ष राजूरकर यांची उपस्थिती ​नांदेड| 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज २३ एप्रिल रोजी नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या वतीने भव्य 'जनआक्रोश आंदोलन' आयोजित करण्यात आले आहे. शहरातील आयटीआय चौक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे सकाळी १०:३० वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आ.श्रीजया चव्हाण व महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांनी केले आहे. केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या ऐतिहासिक 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याच्या विरोधात मतदान करणाऱ्या पक्षांचा पर्दाफाश करणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश...
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोधी पक्षांमुळेच विलंब!

महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोधी पक्षांमुळेच विलंब!

राजकारण
आमदार श्रीजया चव्हाण यांचे टीकास्त्र नांदेड| संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'रालोआ' सरकारने मांडलेली विधेयके मंजूर झाली असती, तर २०२९ च्या निवडणुकीपासूनच लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले असते. मात्र, विरोधी पक्षांच्या विरोधामुळे या प्रक्रियेला विलंब झाला आहे, अशी टीका आमदार श्रीजया चव्हाण यांनी केली. महिला आरक्षणासंदर्भात बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'न्वये महिलांना २०२९ पासून आरक्षण लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या पावलांचे त्यांनी समर्थन केले आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार चव्हाण म्हणाल्या की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. परंतु भारतीय संसदेत महिला खासदारांचे प्रमाण अनेक लहान देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आह...
error: Content is protected !!