केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बालाजी बच्चेवार यांनी घेतली सदिच्छा भेट

नांदेड (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते बालाजी बच्चेवार यांनी आज सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान नायगाव विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे, पायाभूत सुविधा तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणींच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विचारविनिमय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी प्रवीण काचावार व सागर बंडेवार हे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे नायगाव मतदारसंघातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!