महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्याकाँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवा-खा. अशोकराव चव्हाण

नांदेड| महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर विधानसभा ,लोकसभेत अनेक कर्तृत्वान महिलांना संधी मिळाली असती. यातून राज्य व देशाच्या विकासात त्यांना भरीव योगदान देता आले असते. मात्र क्रेडिट मोदी सरकारला जाईल या राजकीय हेतूने महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचाईत समिती निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवार दि. 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ,तथा जिल्हा प्रभारी माजी आ. सुनील राणे, आ.श्रीजया चव्हाण ,प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे ,चैतन्यबापू देशमुख ,माजी मंत्री डी. पी.सावंत, महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर.

महापौर कविता मुळे,उपमहापौर दिपकसिंघ रावत ,स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले ,महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी,उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी ,विजय येवणकर ,प्रवीण साले,माजी महापौर जयश्री पावडे ,शैलजा स्वामी ,शीला भवरे ,मंगारानी अंबुलगेकर ,ज्योती कल्याणकर ,सुषमा थोरात ,उपसभापती लांडगे ,दिलीप ठाकूर ,विजय गंभीरे,शशिकांत क्षिरसागर ,दत्तू देशमुख ,सुरेश लोट ,शीतल खांडील यांच्यासह महानगर पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व मंडल कार्यकारिणी, सर्व मोर्चा व प्रकोष्ठ कार्यकारिणी, शक्ती केंद्र व बूथ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की,नारीशक्ती वंदन अधिनियमन ,महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर महिलांच्या संधीत वाढ झाली असती लोकसभा ते ग्रामपंचायत महिलांना काम करता आले असते. मात्र काँग्रेस ,विरोधी पक्षाच्या नकारात्मक भूमिकेमुळे महिलांची अपेक्षित संधी हिरावल्या गेली आहे. महिलांना सत्तेत अपेक्षित स्थान नाकारणाऱ्याना लोकशाहीत स्थान नाही.

आगामी काळात जनतेच्या भक्कम साथीने दोन तृतीयांश बहुमताच्या बळावर महिला आरक्षण मंजूर करून महिलांना त्यांचा हक्क देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची राहणार आहे.विकासात आता आपण थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र ,विकसित मराठवाडा ,नांदेड हे आपले विकासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता ,नवनवीन तंत्रज्ञान युवकांनी आत्मसात करावेत.

नांदेडात प्रथमच महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून नांदेडात स्थानिक स्वराज्य ते लोकसभा भाजपाचा विजयाचा ट्रेंड कायम राहील असा विश्‍वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.मतदार यादीत कायदेशीर मतदाराची नोंद असावी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत -भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणेयावेळी माजी आ. सुनील राणे म्हणाले की,अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यावेळी आपल्या कुटूंबासह कायदेशीर पात्र मतदारांची नोंद मतदार यादीत असावी यासाठी भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत . मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया सुरु झाली आहे. बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करत आहेत. आपलीकडेही आले असतील आपल्या कुटुंबातील आजोबा ,आजी प्रत्येकाचे मत नोंदवले पाहिजे. बोगस मतदार असले नाही पाहिजे या कडेही लक्ष द्या पश्‍चिम बंगालसह अनेक राज्यात बांग्लादेशी ,बोगस मतदार नोंदवण्यात आले होते.

अशा बोगस मतदारांची नावे कमी करण्यात येत आहेत मात्र पात्र मतदारांची नोंद मतदार यादीत असलीच पाहिजे. या बोगस मतदारांमुळे कोरोना काळात अन्न सुरक्षा योजनेतून दिलेले धान्य बोगस मतदारांनी लाटले होते. विकसित ,आधुनिक भारताची जबाबदारी आता विशेषता युवक व युवतींवर आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सर्वसामान्य व्यक्तीस केंद्रबिंदू मानून विकास व या भागाचा कायापालट केला आहे. आता खा. अशोकराव चव्हाण यांचे विकासाचे व्हिजन ,केलेली विकास कामे व पक्ष वाढीसाठी सामूहिक प्रयत्न केल्यास नांदेडात भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांक असेल या माध्यमातून आगामी निवडणुकीतही भाजपा सत्ता मिळवेल असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला आहे.

खा.चव्हाण यांच्या नेतृत्वातनांदेडात भाजपाच नंबर एक-महानगराध्यक्ष राजूरकरयावेळी महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी प्रास्ताविकात भाजपा महानगर संघटन वाढविण्यासाठी पक्षाच्या वतीने राबविण्यात येणारी उपक्रम ,मनपा निवडणुकीत विजयासाठी पक्षाने वाढवलेला जनसंपर्क ,केंद्र व राज्य सरकार यांच्या वतीने राबविण्यात येणारी जनकल्याणकारी कामे जनसामान्यापर्यंत पोहचवल्याची माहीती दिली.खा. चव्हाण यांचे विकासाचे व्हिजन विकास कामाचा झपाटा यामुळे नांदेडकर नेहमीच सोबत राहिले आहेत आगामी काळातही खा.चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड महानगर भाजपा नंबर एक राहील असा विश्‍वास महानगराध्यक्ष ,माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला आहे.

आ.श्रीजया चव्हाण यांची महिला आरक्षणावर अभ्यासपूर्ण मांडणी -राणेआ.श्रीजया चव्हाण यांनी महिला आरक्षण का आवश्‍यक यावर केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अभिनंदनीय आहे. महिलांच्या अपेक्षित सहभागा शिवाय सर्वागीण विकास अशक्य आहे. महिला आरक्षणाला कोण्ही विरोध केला व महिला आरक्षणाची गरज यावर जनजागृती करावी असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!