
पुतळा सुशोभीकरणाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न


कंधार (सचिन मोरे) लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व महापुरुषांचा सन्मान करणे त्यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे ही जबाबदारी माझी आहे. त्यांच्या बाबतीत मी कधीही भेदभाव केलेला नाही. महापुरुषांची स्मारक त्यांच्या नावाला शोभेल असे भव्य दिशादर्शक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच कंधार शहरात डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारणार असल्याची ग्वाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.


लोहा कंधार मतदार संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निधीतून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सुशोभीकरण कार्यक्रमाचे आयोजन १८ मे रोजी दुपारी तीन वाजता आमदार चिखलीकर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप भोळे, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, स्वप्निल पाटील लुंगारे,माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे, भगवान राठोड, अनिल पाटील बोरगावकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर माजी जि प सभापती,माजी उपाध्यक्ष जफर उल्लाखान,नगरसेवक समीर चाऊस, कैलास कांबळे, मधुकर डांगे, मनोहर पाटील भोसीकर, ग्रामसेवक संघटनेचे गंगाधर कांबळे, पिंटू कदम, महेश पिनाटे,राजकुमार केकाटे,महेंद्र कांबळे बालाजी कांबळे,विलास वाघमारे असिफ शेख, सचिन बसवंते, दिग्विजय कांबळे, रामभाऊ देव कांबळे, पंडितराव देवकांबळे, परमेश्वर जाधव,मारोती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.



प्रारंभी अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने आमदार चिखलीकर यांचा शाल श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना चिखलीकर म्हणाले, मी १९९२ पासून राजकारण करतो, माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात मला सातत्याने निवडून दिलात. हे मी विसरणार नाही. हा समाज मोलमजुरी करणारा कष्टकरी प्रामाणिक आहे. पण आता हळूहळू चित्र बदले असून या समाजामध्ये अनेक विद्वान जन्माला येत आहेत. हा समाज देखील आगामी काळात मागे राहणार नाही असे गौरवोउद्धार आमदार चिखलीकर यांनी काढले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ फुले माजी सरपंच, विनायक मोरे, बालाजी देवकांबळे माजी सरपंच, हणमंत घोरपडे,मच्छिंद्र देवकांबळे, बालाजी वाघमारे, बालाजी देवकांबळे, प्रशांत घोडजकर,संभाजी गडंबे,व्यंकट कांबळे, पराक्रम कांबळे, कृष्णा गायकवाड, दयानंद वाघमारे, सूर्यकांत वाघमारे, श्याम गडंबे,अजय कांबळे यांनी परिश्रम घेतले.
कंधार येथील अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलामध्ये साहित्यरत्न भाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा आगामी काळामध्ये उभारण्यात येणार असून यासाठी भरीव निधी देण्यात आलेला आहे. हा पुतळा सुंदर, रेखीव, आकर्षक पद्धतीने बसून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे स्मारक मॉडेल व दिशादर्शक व्हावे यासाठी निधी कमी पडणार नाही. स्मारक पाहण्यासाठी जिल्ह्यातील बहुजन बांधव कंधारला येथील असा पुतळ्याचा नावलौकिक व्हावा यासाठी आपण लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
