
उमेदवारी अर्ज दाखल; समर्थकांची मोठी उपस्थिती
हिमायतनगर, जांबुवंत मीराशे | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत हिमायतनगर मतदारसंघातील राजकीय वातावरणाला मंगळवारी (दि. ३० जून) वेग आला. या मतदारसंघातून विशाल राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला.


उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि हितचिंतक यावेळी उपस्थित होते. अर्ज दाखल झाल्यानंतर समर्थकांनी आनंद व्यक्त करत घोषणाबाजी केली.



हिमायतनगर मतदारसंघ हा जिल्हा बँक निवडणुकीतील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात असून, येथील लढतीकडे राजकीय व सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणुकीतील समीकरणांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.


