Tag: हदगाव

हदगावच्या राजकारणात ट्विस्ट; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जवळगावकरांचे मोठे वक्तव्य

हदगावच्या राजकारणात ट्विस्ट; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जवळगावकरांचे मोठे वक्तव्य

राजकारण
भाजप प्रवेशाच्या चर्चांना जवळगावकरांचा ब्रेक; "मी काँग्रेसमध्येच, अफवांवर विश्वास ठेवू नका" हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच जवळगाव येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत, "मी काँग्रेस पक्षामुळेच आज या स्थानावर पोहोचलो आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही," अशी भूमिका मांडली. जवळगाव येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली मते व्यक्त केली. काहींनी जवळगावकर यांनी काँग्रेसमध्येच राहू...
हदगाव येथे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

हदगाव येथे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

राजकारण
जनसंपर्क कार्यालयात छोटेखानी बैठकीत संघटनात्मक कामांचा घेतला आढावा हदगाव/नांदेड | हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी आज हदगाव येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची छोटेखानी बैठक घेत विविध विषयांवर चर्चा केली. हदगाव येथील माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत परिसरातील घडामोडी, संघटनात्मक उपक्रम तसेच सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या, अडचणी तसेच सूचना माजी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी सकारात्मक चर्चा करत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्न सोडव...
हदगाव बस स्थानकात भीषण अपघात; एसटी बसची धडक लागून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

हदगाव बस स्थानकात भीषण अपघात; एसटी बसची धडक लागून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

क्राइम
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील बस स्थानकात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उत्तम आबाजी वाघमारे (वय ७०, रा. पेवा, ता. हदगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम वाघमारे हे आपल्या गावाकडे जाण्यासाठी हदगाव बस स्थानकात आले होते. यावेळी भंडारा–औसा एसटी बस (क्रमांक MH 14 MH 2740) स्थानकात प्रवेश करत असताना, ते बसच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर अपघात झाला. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. संबंधित एसटी बस हदगाव पोली...
हदगाव येथे वीज समस्यांवर आढावा बैठक; तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश

हदगाव येथे वीज समस्यांवर आढावा बैठक; तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश

राजकारण
हदगाव (प्रतिनिधी) नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSCB) च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत निवघा, तळणी, हदगाव, ल्याहरी, आष्टी तसेच हिमायतनगर तालुक्यातील विविध फीडर संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वारंवार होणारी वीज खंडित होणे, जळालेल्या डीपी (ट्रान्सफॉर्मर), नवीन वीज खांब उभारणी तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्या चर्चेत घेण्यात आल्या. यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना देत सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीमुळे परिसरातील वीज समस्यांवर लवकरच तोडगा निघण्याची ...
हदगाव शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष; भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

हदगाव शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष; भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरात अक्षय तृतीया निमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १९ एप्रिल रोजी घरोघरी प्रतिमा पूजन करण्यात आले, तर २० एप्रिल रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय परशुराम’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. शोभायात्रेची सुरुवात शहरातील मानाचे श्री सत्य गणपती मंदिर येथून करण्यात आली. पारंपरिक गणपती मार्गानुसार ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरली. शेवटी भगवान परशुराम यांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. परसरामजी तिवारी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. या सोहळ्यासाठी हदगाव शहरासह तामसा, मनाठा, भानेगाव, शिरड आदी गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, पुरुष आणि लहान मुलांचा उत्साह विशेष उल्...
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हदगाव तालुक्यातील दोन सख्खे भाऊ विना-कोचिंग बनले स्थापत्य अभियंता

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हदगाव तालुक्यातील दोन सख्खे भाऊ विना-कोचिंग बनले स्थापत्य अभियंता

करियर
हदगाव,गौतम वाठोरे| परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर कोणतेही शिखर गाठता येते, याचे उत्तम उदाहरण हदगाव तालुक्यातील उंचेगाव (बु.) येथील जमदाडे बंधूंनी घालून दिले आहे. गंगाधर किशन जमदाडे यांचे पुत्र कपिल आणि नयन यांनी कोणत्याही खाजगी कोचिंगचा आधार न घेता स्व-अभ्यासाच्या जोरावर ‘स्थापत्य अभियंता’ होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोठे बंधू कपिल गंगाधर जमदाडे यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर सातत्याने अभ्यास करत स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर आजवर पाच विविध सरकारी पदांवर त्यांची निवड झाली आहे. सुरुवातीला त्यांनी महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्य केले. त्यानंतर लातूर महानगरपालिकेत बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून निवड झाली. पुढे नगररचना विभागात सहाय्यक रचनाकार तसे...
प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

आरोग्य, शेती
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्र...
कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील कमलाई नगर परिसरात ३ एप्रिल रोजी संकटमोचन हनुमान मंदिरातील कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमय प्रसंगी परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात पार पडलेल्या धार्मिक विधी, पूजन आणि कलशारोहण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत संकटमोचन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला परमपूज्य महंत गोपाळगीर गुरुरायगिर महाराज (दत्तबर्डी संस्थान), शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव संस्थान), योगिराज बापू गुरु दत्ताबापू (श्रीकृष्ण मंदिर), आमदार बाबुराव कदम कोहळीकर, नगराध्यक्ष रोहिणीताई वानखेडे, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गटनेते गोपाल भाऊ सारडा, शहरप्रमुख बबन...
हदगाव आर्य वैश्य समाजाची एकजूट ठरली प्रेरणादायी

हदगाव आर्य वैश्य समाजाची एकजूट ठरली प्रेरणादायी

सामाजिक
हदगाव | हदगाव येथील आर्य वैश्य समाजाने मंगल कार्यालय उभारण्यासाठी केलेली निधी उभारणी ही इतर समाजांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंद बिडवई यांनी केले. ते हदगाव येथे आयोजित आर्य वैश्य मंगल कार्यालय भूमिपूजन, देणगीदारांचा सहपरिवार सत्कार व महासभेच्या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, नांदेड जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि मंगल कार्यालयाचे भूमिपूजन मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात बोलताना गोविंद बिडवई यांनी सांगितले की, छोट्याशा गावात सुमारे ९० कुटुंबे असतानाही तब्बल ८० घरांनी स्वखर्चाने देणगी देत मंगल कार्यालय उभारण्याचा घेतलेला संकल्प हा समाजाच्या एकजुटीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. “आपणच आपल्या समाजासाठी उभे राहून व...
हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

शेती
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणग्रस्त पांदण (शेत) रस्ते तात्काळ खुले करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यातील अनेक शासकीय पांदण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही. परिणामी शेतीकामासाठी आवश्यक अवजारे, यंत्रसामग्री ने-आण करणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर रस्ते बंद झाल्याने शेती पडीत राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचबरोबर रस्त्यांच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तणाव आणि भांडणे वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, शासनाने पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, रस्त्याचे नुकसान करणाऱ्या किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आह...
error: Content is protected !!