कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील कमलाई नगर परिसरात ३ एप्रिल रोजी संकटमोचन हनुमान मंदिरातील कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात पार पडला.

या मंगलमय प्रसंगी परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात पार पडलेल्या धार्मिक विधी, पूजन आणि कलशारोहण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत संकटमोचन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

या कार्यक्रमाला परमपूज्य महंत गोपाळगीर गुरुरायगिर महाराज (दत्तबर्डी संस्थान), शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव संस्थान), योगिराज बापू गुरु दत्ताबापू (श्रीकृष्ण मंदिर), आमदार बाबुराव कदम कोहळीकर, नगराध्यक्ष रोहिणीताई वानखेडे, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गटनेते गोपाल भाऊ सारडा, शहरप्रमुख बबन माळोदे, भास्कर वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरसेवक किशोर भोस्कर, पांडुरंग जाधव, रविशंकर गुडूप, गुणवंत काळे, बालाजी राठोड, राजेश तावडे आदींसह कमलाई नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लोकार्पण करण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे उद्यान हे सुसज्ज व आकर्षक स्वरूपाचे असून नागरिकांसाठी विरंगुळा व आनंदाचे केंद्र ठरणार आहे. या उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून स्थानिकांना एक उत्तम सार्वजनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने कमलाई नगर परिसरात धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!