
जनसंपर्क कार्यालयात छोटेखानी बैठकीत संघटनात्मक कामांचा घेतला आढावा


हदगाव/नांदेड | हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी आज हदगाव येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची छोटेखानी बैठक घेत विविध विषयांवर चर्चा केली.


हदगाव येथील माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत परिसरातील घडामोडी, संघटनात्मक उपक्रम तसेच सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.


यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या, अडचणी तसेच सूचना माजी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी सकारात्मक चर्चा करत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


बैठकीदरम्यान आगामी कामकाज, सामाजिक उपक्रम आणि मतदारसंघातील विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
