Tag: (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 *अमरनाथ गुहेतून* – भाग 16  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 *अमरनाथ गुहेतून* – भाग 16 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
आजच्या अंकात प्रवासात सोबत असलेल्या यात्रेकरुंच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. *सुभाष देवकत्ते* दिलीपभाऊंसोबतची ही माझी सलग अकरावी अमरनाथ यात्रा. प्रत्येक वर्षी त्यांच्यासोबत प्रवास करताना त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने उलगडत जाते. माझ्या दृष्टीने ते पर्यटन क्षेत्राचे भीष्म पितामह आहेत. आजवर त्यांनी विक्रमी २७ वेळा श्री अमरनाथचे दर्शन घेतले असून, प्रत्येक वेळी शेकडो भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि संस्मरणीय यात्रा घडवून आणली आहे. एवढ्या मोठ्या यात्रेचे व्यवस्थापन करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र कोणतेही संकट आले, अडचण निर्माण झाली किंवा परिस्थिती बदलली तरी दिलीपभाऊ कधीही गोंधळत नाहीत. शांत डोक्याने निर्णय घेऊन ते प्रत्येक प्रश्नावर सहज मार्ग काढतात. शंभराहून अधिक यात्रेकरूंचा संपूर्ण समूह ते अक्षरशः एकहाती सांभाळतात. प्रत्येकाची माहिती, प्रवासाचे वेळापत्रक, मुक्काम, जेवण, दर्शन, वाहतूक, आरो...
 अमरनाथ गुहेतून –  भाग 13 :   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून –  भाग 13 :  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
कटरा ते अमृतसर… देशभक्ती, सहप्रवास आणि अविस्मरणीय क्षण काल वैष्णोदेवीचे दर्शन घेताना सर्व यात्रेकरूंनी अक्षरशः आपल्या क्षमतेची परीक्षा दिली होती. डोंगर चढणे, दर्शनासाठी रांगेत उभे राहणे आणि पुन्हा परतीचा प्रवास यामुळे जवळपास सर्वच जण थकले होते. म्हणूनच यावेळी मी मुद्दाम एक वेगळा निर्णय घेतला. अमृतसरला जाण्यासाठी बसेस नेहमीपेक्षा थोड्या उशिरा, म्हणजे दुपारी बारा वाजता बोलावल्या. सर्वांना रात्रीची झोप पूर्ण करता यावी आणि सकाळी निवांत उठता यावे, एवढाच त्यामागचा हेतू होता. पण सकाळी उठून पाहतो तर काय, बरेच जण सात वाजण्यापूर्वीच तयार! सीनियर सिटीजन कितीही म्हटले तरी त्यांच्या अंगची लवकर उठण्याची सवय काही जात नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. आजच्या सकाळच्या नाश्त्याचे प्रायोजक होते उमरीचे भगवानशेठ आसवा. काही वर्षांपूर्वी ते आमच्यासोबत अमरनाथ यात्रेला आले होते. त्यांच्या वतीने सर्वांसाठी ...
 अमरनाथ गुहेतून – भाग 12  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग 12 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“मातेच्या चरणी नतमस्तक… भैरवनाथाचे दर्शन आणि श्रद्धेचा अविस्मरणीय प्रवास!” - भवनाचे पहिले दर्शन होताच आमच्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कित्येक तासांची चढाई, घामाने भिजलेले कपडे आणि दमलेले पाय क्षणात विसरून गेलो. समोर त्रिकूट पर्वताच्या कुशीत वसलेले माता वैष्णोदेवीचे पवित्र भवन तेजाने उजळून निघाले होते. हजारो भाविकांच्या मुखातून घुमणारा “जय माता दी”चा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सुरक्षा तपासणी पूर्ण करून आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन आणि भाविकांची संयमी शिस्त पाहून समाधान वाटले. अखेर तो बहुप्रतीक्षित क्षण आला. समोर मातेच्या तीन पवित्र पिंडींचे दर्शन होताच हात आपोआप जोडले गेले. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या त्या दिव्य रूपासमोर उभे राहून मी एकच प्रार्थना केली— “हे जगन्माते, माझ्या परिवारावर, सहप्रवाशां...
 अमरनाथ गुहेतून – भाग ११  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ११ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“जय माता दी”च्या जयघोषात… कटऱ्यापासून भवनापर्यंत श्रद्धेची अविस्मरणीय चढाई! - रात्रभराच्या प्रवासानंतर शरीराला विश्रांतीची गरज होती, पण मनाला मात्र झोप कुठे होती? कारण आजचा दिवस होता जगप्रसिद्ध माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा! बहुतेक हे माझे 31 वे माताराणी चे दर्शन असावे. बाबा बर्फानींच्या पवित्र गुहेत नतमस्तक झाल्यानंतर आता त्रिकूट पर्वतावर विराजमान असलेल्या जगन्मातेच्या चरणी माथा टेकविण्याचा योग आमच्या संपूर्ण परिवाराला लाभणार होता. पहाटे चार वाजताच हॉटेल ग्रँड शरणमध्ये प्रत्येक खोलीत हालचाल सुरू झाली. कुणी खोलीतील केटलमध्ये चहा बनवत होते, कुणी गरम पाण्याने स्नान करून तयार होत होते, तर कुणी एकमेकांच्या दरवाजावर टकटक करून, “चला… वेळ झाली!” अशी हाक देत होते. नऊ दिवसांपासून एकत्र राहिलेल्या या शंभर जणांच्या परिवारात आता औपचारिकतेचा लवलेशही उरला नव्हता. कोणाचे औषध कोणाकडे आहे, कोणाचा मोबाईल चार...
 अमरनाथ गुहेतून – भाग १०   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग १०  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
दल सरोवराच्या लाटांवरून कटऱ्याच्या कुशीत… १०० यात्रेकरूंच्या आठवणींचा जिवंत प्रवास! - अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ एका पवित्र गुहेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही. ही यात्रा माणसांना जवळ आणते, अनोळखी चेहऱ्यांना मित्र बनवते आणि काही दिवसांतच शंभर वेगवेगळ्या व्यक्तींना एका विशाल कुटुंबात गुंफते. आज त्या कुटुंबाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा दिवस उजाडला होता. आजचा दिवस माझ्यासाठी आणखी एका कारणाने खास होता. १९९७ साली मी, माझी पत्नी जयश्री आणि त्यावेळी अगदी लहान असलेल्या माझ्या मुली नेहा व पूजा यांनी काश्मिरी पोशाखात काढलेला एक फोटो मुलींनी आजही जपून ठेवला आहे. त्याच शैलीत पुन्हा एकदा फोटो काढण्याचा योग आज आला. त्या वेळी हातात बोट धरून चालणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींना आज प्रत्येकी दोन-दोन लेकरं आहेत. काळ इतक्या वेगाने पुढे निघून गेला, हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. काही क्षण कॅमेऱ्यात ब...
 अमरनाथ गुहेतून – भाग ९   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ९  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“गुलमर्गच्या हिरव्यागार कुशीत… निसर्ग, माणुसकी आणि अन्नदानाचा अविस्मरणीय संगम!” - अमरनाथ यात्रेतील प्रत्येक दिवस वेगळा असतो. एखादा दिवस श्रद्धेची परीक्षा घेतो, एखादा शरीराच्या क्षमतेची कसोटी पाहतो, तर एखादा दिवस आयुष्यभर पुरेल एवढ्या आठवणी मनाच्या ओंजळीत अलगद ठेवून जातो. अमरनाथच्या पवित्र गुहेत बर्फानी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनात एक विलक्षण समाधान होते. शरीर थकलेले असले तरी अंतर्मन मात्र प्रसन्न होते. आता यात्रेतील कठीण टप्पे मागे पडले होते आणि आज आमची वाट होती पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्गकडे! सकाळी सात वाजता सर्व यात्रेकरू उत्साहाने तयार झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. अमरनाथ दर्शनाचा आध्यात्मिक आनंद अजूनही मनात ताजा होता आणि आता त्याला काश्मीरच्या अप्रतिम सृष्टीसौंदर्याची जोड मिळणार होती. आमच्या गाड्या श्रीनगरमधून गुलमर्गच्या दिशेने निघाल्या. रस्त्...
अमरनाथ गुहेतून – भाग ८ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

अमरनाथ गुहेतून – भाग ८ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
बाबांच्या सान्निध्यातून… आता श्रीनगरच्या कुशीत! कालचा दिवस आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय ठरला होता. बाबा बर्फानींचे दर्शन, तब्बल २८ किलोमीटरचा खडतर प्रवास आणि हजारो भाविकांच्या “बम बम भोले”च्या जयघोषात आम्ही पुन्हा बालटाल बेस कॅम्पमध्ये परतलो होतो. शरीर थकले होते, पण मन मात्र अपार समाधानाने भरून गेले होते. आज श्रीनगरकडे परतीचा प्रवास होता. एका अर्थाने यात्रेचा धार्मिक टप्पा पूर्ण झाला होता आणि आता निसर्गसौंदर्याचा अध्याय सुरू होणार होता. यात्रेच्या मार्गावर मी भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे स्वागत करणारे चार बॅनर लावले होते. त्या बॅनरवर भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, खासदार मा. अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष व आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकाराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख तसेच माझे छायाचित्...
 अमरनाथ गुहेतून – भाग ७  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ७  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“भोलेनाथाच्या दरबारात… श्रद्धा, साहस आणि समाधानाचा दिवस!” अमरनाथ यात्रेचा सर्वांत महत्त्वाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा दिवस अखेर उजाडला. खरे तर “उजाडला” म्हणणेही चुकीचे ठरेल, कारण हा दिवस सुरू झाला तो मध्यरात्रीच! दिवसभराचा प्रवास, थंडी, उंच पर्वत, विरळ ऑक्सिजन आणि भोलेनाथाच्या दर्शनाची ओढ… या सगळ्यांचे अनोखे मिश्रण मनात होते. रात्री सर्वांना सूचना दिल्या होत्या की, बरोबर दोन वाजता आंघोळ करून तयार राहायचे. पण यात्रेकरूंचा उत्साह एवढा अफाट होता की दीड वाजताच सर्वजण तयार होऊन उभे होते. कोणाच्या चेहऱ्यावर झोप नव्हती; उलट प्रत्येकाच्या डोळ्यांत फक्त एकच स्वप्न होते—“आज भोलेनाथाचे प्रत्यक्ष दर्शन होणार!” पूजा टेन्ट हाऊससमोर आधीच घोडेवाले आणि डोलीवाले आपल्या यात्रेकरूंची वाट पाहत उभे होते. ज्यांनी डोलीची व्यवस्था केली होती, त्यांना काळजीपूर्वक डोलीत बसवण्यात आले. घोड्यावर जाणाऱ्यांना मात्र जव...
 अमरनाथ गुहेतून – भाग ६   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ६  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
श्रीनगर ते बालटाल : आता सुरू झाली खरी यात्रा! - काल वंदे भारतच्या अविस्मरणीय प्रवासानंतर आम्ही श्रीनगरला पोहोचलो होतो. आधुनिक भारताचा चमत्कार अनुभवला होता; पण आज आम्हाला सनातन श्रद्धेच्या चमत्काराकडे वाटचाल करायची होती. बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी बालटाल बेस कॅम्प गाठायचा होता. पहाटेपासूनच यात्रेकरूंमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता. काहींनी स्वेटर, जॅकेट, रेनकोट, मफलर, हातमोजे अशी इतकी तयारी केली होती की ते अमरनाथ यात्रेला चालले आहेत की एव्हरेस्ट सर करायला, असा प्रश्न पडावा! तर काही जण अगदी निवांत होते. “दिलीपभाऊ आहेत ना…” हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शंभर यात्रेकरूंचा समूह म्हणजे एक छोटे गावच. त्यामुळे व्यवस्थापन सुलभ व्हावे म्हणून पाच गट तयार करण्यात आले—प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्व्हर आणि रुबी. प्रत्येक गटाला एक कॅप्टन आणि एक कॅशियर नेमण्यात आला. ही केवळ संघटना...
 अमरनाथ गुहेतून – भाग ५  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ५  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“धरतीवरील स्वर्ग…आणि स्वर्गालाहीअस्वस्थ करणारी वास्तवाची चाहूल!” वंदे भारतचा हवाहवासा वाटणारा प्रवास संपला आणि संध्याकाळच्या सुमारास आम्ही श्रीनगर रेल्वे स्थानकावर उतरलो. रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील सुखद प्रवास मागे पडला होता आणि आता आम्ही हिमालयाच्या कुशीत, बाबा बर्फानींच्या दर्शनाच्या उंबरठ्यावर उभे होतो.स्टेशनवर माझे जुने सहकारी आणि टूर ऑपरेटर सज्जादभाई स्वतः आम्हाला घेण्यासाठी आले होते. गेली अनेक वर्षे यात्रेच्या आयोजनात ते आमचे विश्वासू साथीदार आहेत. चेहऱ्यावर नेहमीचे हसू, पण डोळ्यांत मात्र काश्मीरच्या परिस्थितीची जाणीव स्पष्ट दिसत होती. यावर्षी एक महत्त्वाचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. मोठ्या लक्झरी बसेस न करता वीस आसनी पाच मिनी बसेस केल्या. कारण स्पष्ट होते. मोठ्या वाहनांना सुरक्षा तपासणीसाठी वारंवार अडवले जात होते. प्रत्येक नाक्यावर तपासणी, चौकशी, कागदपत्रांची पडताळणी… ...
error: Content is protected !!