अमरनाथ गुहेतून – भाग ६  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

श्रीनगर ते बालटाल : आता सुरू झाली खरी यात्रा! – काल वंदे भारतच्या अविस्मरणीय प्रवासानंतर आम्ही श्रीनगरला पोहोचलो होतो. आधुनिक भारताचा चमत्कार अनुभवला होता; पण आज आम्हाला सनातन श्रद्धेच्या चमत्काराकडे वाटचाल करायची होती. बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी बालटाल बेस कॅम्प गाठायचा होता. पहाटेपासूनच यात्रेकरूंमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता.

काहींनी स्वेटर, जॅकेट, रेनकोट, मफलर, हातमोजे अशी इतकी तयारी केली होती की ते अमरनाथ यात्रेला चालले आहेत की एव्हरेस्ट सर करायला, असा प्रश्न पडावा! तर काही जण अगदी निवांत होते. “दिलीपभाऊ आहेत ना…” हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

शंभर यात्रेकरूंचा समूह म्हणजे एक छोटे गावच. त्यामुळे व्यवस्थापन सुलभ व्हावे म्हणून पाच गट तयार करण्यात आले—प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्व्हर आणि रुबी. प्रत्येक गटाला एक कॅप्टन आणि एक कॅशियर नेमण्यात आला. ही केवळ संघटनात्मक व्यवस्था नव्हती; पुढील काही दिवस एकमेकांची काळजी घेणारे, औषधापासून पाण्याच्या बाटलीपर्यंत सर्व काही वाटून घेणारे हेच आमचे यात्रा कुटुंब होते. हॉटेलबाहेर पाच नव्या बसेस आमची वाट पाहत उभ्या होत्या. बसमध्ये बसताच मी नेहमीप्रमाणे एक महत्त्वाची घोषणा केली.

“दररोज सीट बदलायच्या!” – काही जण हसले, काहींनी मान डोलावली. कारण मोठ्या समूहात सर्वात मोठे राजकारण जर कुठे होत असेल, तर ते बसच्या सीटवर! पुढची सीट मिळाली की काहींना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते आणि मागची सीट मिळाली की निवडणूकीत डिपाझिट गेल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे दररोज सीट बदलण्याचा नियम हा यात्रेतील शांततेचा आधारस्तंभ आहे. यात्रेत श्रद्धा जितकी महत्त्वाची असते, तितकीच समजूतदारपणाही महत्त्वाचा असतो.

पहिल्या लंगरची पहिली पंगत – सकाळी सातच्या सुमारास सुरक्षा तपासण्या पूर्ण करून आमचा ताफा पुढे निघाला. सकाळी सातच्या सुमारास सुरक्षा तपासण्या पूर्ण करून आमचा ताफा पुढे निघाला. काही अंतर गेल्यानंतर हजरथ बल दर्गा पहिला. तिथे असलेल्या शेकडो कबुतरा सोबत फोटो काढतांना वरिष्ठ नागरिक देखील बालपणी गेल्या सारखे वाटत होते. पुढचा टप्पा होता. 

खीर भवानी माता मंदिर . (मंदिराची माहिती थोडक्यात देणे )लंगरमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता म्हणावा की जेवण म्हणावे अशी परिस्थिती होती. काली दाल, भाजी, चन्ने, खीर, पुरी आणि अजून बरेच काही! काही यात्रेकरूंनी पहिल्याच फेरीत इतके पदार्थ घेतले की त्यांना पाहून वाटत होते, जणू पुढे संपूर्ण काश्मीरमध्ये अन्नटंचाई जाहीर होणार आहे!

प्रवास लांबचा असल्यामुळे बसमध्ये “समोसा-कचोरी” हा खेळ सुरू करण्यात आला. विजेत्याला पाचशे रुपये बक्षीस आणि हरलेल्याला गाणे, विनोद किंवा उठाबशा! नियम जाहीर होताच बसमध्ये उत्साहाची लाट पसरली. काहींनी गाणी म्हटली, काहींनी विनोद सांगितले आणि काहींनी गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाकीच्या यात्रेकरूंनी त्याला विनोद समजून टाळ्या वाजवल्या! एवढे हशे पिकले की ड्रायव्हरलाही मागे वळून बघण्याचा मोह आवरत नव्हता.

प्रवास लांबचा असल्यामुळे बसमध्ये अंताक्षरीचा खेळ सुरू झाला. काहींनी हिंदी गाणी म्हटली, काहींनी मराठी. काहींनी मात्र गाणे गद्यात म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाकीच्या यात्रेकरूंनी त्यालाच विनोद समजून टाळ्यांचा कडकडाट केला! एवढा हशा पिकला की ड्रायव्हरलाही आरशातून मागे पाहण्याचा मोह आवरत नव्हता.

सिंधू नदीचा किनारा – 
पुढे सिंधू नदीच्या किनाऱ्यावर रिव्हर राफ्टिंगसाठी थांबलो. मात्र सुरक्षा कारणांमुळे त्या दिवशी राफ्टिंग बंद होते. तरीही समोर उभे असलेले हिमालयाचे भव्य रूप, निळसर वाहणारी सिंधू आणि सभोवताली पसरलेली हिरवाई पाहून प्रत्येक यात्रेकरू हरखून गेला. मोबाईल कॅमेरे अक्षरशः थांबत नव्हते. कुणी रिल्स तयार करत होते, कुणी ग्रुप फोटो घेत होते, तर कुणी त्या अविस्मरणीय क्षणांना मनात साठवत होते.

सोनमर्ग ते बालटाल : बाबा बर्फानींच्या दारात – पुढचा टप्पा होता सोनमर्ग.पूर्वी सोनमर्ग गाठायला पाच तास लागत असत. पण नव्याने सुरू झालेल्या साडेसहा किलोमीटर लांबीच्या सोनमर्ग बोगद्यामुळे हा प्रवास आता खूपच सोयीचा झाला आहे.बोगद्यात शिरताच मी “जय भोले!” चा नारा दिला आणि आश्चर्य म्हणजे संपूर्ण बोगदा संपेपर्यंत घोषणांचा जयघोष सुरूच राहिला. बाहेर पडताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

फिश पॉईंटवर पोहोचल्यावर यात्रेकरूंमधील लहान मूल पुन्हा जागे झाले. कुणी सेल्फी घेत होते, कुणी व्हिडिओ बनवत होते, तर कुणी रिल्स तयार करण्यात व्यस्त होते. काही जणांनी इतके फोटो काढले की परत गेल्यावर त्यांना अमरनाथ यात्रेच्या आठवणींपेक्षा फोटो निवडण्याचे कामच जास्त पडणार होते!

दुपारी चारच्या सुमारास आम्ही बालटाल बेस कॅम्पमध्ये पोहोचलो.आता खऱ्या अर्थाने यात्रेच्या उंबरठ्यावर उभे होतो.कडेकोट सुरक्षा, प्रत्येक यात्रेकरूची तपासणी, RFID कार्डांची पडताळणी आणि सर्वत्र तैनात असलेले भारतीय जवान पाहून मनात सुरक्षिततेचा प्रचंड विश्वास निर्माण झाला.नेहमीप्रमाणे माझा मुक्काम पूजा टेंट हाऊसमध्येच होता. दिवसभराच्या प्रवासानंतर गादी, रजई आणि उशीची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलपेक्षाही अधिक मौल्यवान वाटत होती.

उद्याच्या घोडा आणि डोली प्रवासाचे सर्व बुकिंग पूर्ण करून घेतले. कारण श्रद्धा कितीही मोठी असली, तरी व्यवस्थापन वेळेवर झाले तरच यात्रा सुखरूप होते. रात्री लंगरमध्ये भोजन करून सर्व यात्रेकरूंना मी एकच सूचना दिली—“उद्याची यात्रा शरीराची कमी आणि मनाची जास्त परीक्षा आहे. त्यामुळे आजची झोप म्हणजे उद्याच्या दर्शनाची तयारी समजा.”

बाहेर हिमालयाच्या कुशीत थंड वारा वाहत होता. तंबूंमध्ये शांतता पसरली होती. मात्र त्या शांततेतही प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते. डोळे मिटले होते, पण मन जागे होते. प्रत्येक यात्रेकरूच्या अंतःकरणात एकच प्रार्थना घुमत होती— “बाबा बर्फानी… उद्या तुझ्या चरणी सुखरूप पोहोचू दे!”उद्याचा दिवस केवळ यात्रेचा नव्हता… तो आयुष्यभर स्मरणात राहणाऱ्या दिव्य भेटीचा दिवस होता.                (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!