Tag: आमदार बाबुराव कदम कोहळीकर

डीपीडीसी बैठकीत आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा संताप; ‘लोडशेडिंग बंद करा, नाहीतर बैठकच थांबवा’

डीपीडीसी बैठकीत आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा संताप; ‘लोडशेडिंग बंद करा, नाहीतर बैठकच थांबवा’

महाराष्ट्र
ग्रामीण जनता अंधारात, महावितरणचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’! नांदेड, अनिल मादसवार| ग्रामीण भागातील जनता रात्रीच्या अंधारात आणि महावितरणचे अधिकारी मात्र जनतेच्या फोनपासून दूर, अशी संतप्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हदगाव–हिमायतनगरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रात्रीच्या लोडशेडिंगच्या प्रश्नावर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणला चांगलेच धारेवर धरले. वारंवार सूचना देऊनही अधिकारी सुधारत नसतील तर काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा; अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकेन किंवा बैठक इथेच समाप्त करावी, असा थेट इशारा आमदार कोहळीकर यांनी दिला. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असताना शहरी भागाला तुलनेने वेगळे प्राधान्य का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शहरी भागात माणसे...
ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद करा – आमदार बाबुराव कदम कोहळीकरांची मागणी

ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद करा – आमदार बाबुराव कदम कोहळीकरांची मागणी

राजकारण
हदगाव/हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असताना, हदगाव-हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद करावी, अशी ठाम मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. पावसाळ्यात साप, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढतो. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार कोहळीकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. महावितरणचे ग्राहक ग्रामीण असोत किंवा शहरी—सर्वांकडून वीजबिल आकारले जाते. मग अखंडित वीजपुरवठा केवळ शहराला आणि रात...
हदगाव-हिमायतनगरचा किनवटमध्ये समावेश मान्य नाही; आमदार बाबुराव कदम कोहळीकर ठाम

हदगाव-हिमायतनगरचा किनवटमध्ये समावेश मान्य नाही; आमदार बाबुराव कदम कोहळीकर ठाम

महाराष्ट्र
हदगाव-हिमायतनगरच्या हितासाठी विधानमंडळात बुलंद आवाज हदगाव/हिमायतनगर/नांदेड /मुंबई| हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विधानमंडळात ठाम विरोध दर्शवत मतदारसंघाच्या हिताची जोरदार बाजू मांडली. दोन्ही तालुके किनवट जिल्ह्यात समाविष्ट झाल्यास नागरिकांवर अन्याय होईल आणि प्रशासनापर्यंत पोहोचणे अधिक कठीण होईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू असताना किनवटला जिल्ह्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, हदगाव आणि हिमायतनगर हे दोन्ही तालुके नांदेड जिल्ह्याशी भौगोलिक, प्रशासकीय आणि सामाजिकदृष्ट्या अधिक निगडित असल्याचे आमदार कोहळीकर यांनी सभागृहात नमूद केले. त्यांनी सांगितले की, मतदारसंघातील अनेक गावे आधीच दुर्गम भागात आहेत. अशा परिस्थितीत प्रशासकीय सीमा बदलल्यास नागरि...
हदगाव-हिमायतनगरचा समावेश किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची शासनाकडे ठाम मागणी

हदगाव-हिमायतनगरचा समावेश किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची शासनाकडे ठाम मागणी

राजकारण
नांदेड /हदगांव /हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव आणि हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांचा समावेश प्रस्तावित किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात न करता, त्यांना पूर्वीप्रमाणेच नांदेड अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी कायम जोडून ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात आमदार कोहळीकर यांनी स्पष्ट केले की, हदगाव व हिमायतनगर या तालुक्यांचे प्रशासकीय, भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी आणि सामाजिक संबंध अनेक दशकांपासून नांदेडशी घट्ट जोडलेले आहेत. त्यामुळे या तालुक्यांना किनवटशी जोडण्याचा निर्णय नागरिकांच्या हिताचा नसून त्यांना मोठ्या गैरसोयीचा ठरेल. हदगाव ते किनवट हे अंतर सुमारे १०० ते १२० किलोमीटर, तर काही गावांमधून १४० किलोमीटरहून अधिक आहे. याउलट नांदेड हे तु...
हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

राजकारण
नांदेड/हदगाव/हिमायतनगर | हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व शेतकरीहिताचे करण्यासाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी, "आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या बळावर सहकारी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असून, यापुढेही आपले आशीर्वाद आणि सहकार्य कायम लाभावे," अशी भावना व्यक्त केली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आ...
कृत्रिम खत टंचाईबाबत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी वामनराव पाटलांनी केली महत्त्वपूर्ण चर्चा; सखोल चौकशीचे आश्वासन

कृत्रिम खत टंचाईबाबत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी वामनराव पाटलांनी केली महत्त्वपूर्ण चर्चा; सखोल चौकशीचे आश्वासन

राजकारण
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात निर्माण झालेल्या कृत्रिम खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महायुतीचे लोकप्रिय लोकनेते तथा आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी वामनराव पाटील वडगावकर यांनी अनेक खत विक्रेते “खत उपलब्ध नाही” असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा मुद्दा आमदारांच्या निदर्शनास आणून दिला. दुसरीकडे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खताचा साठा गोडाऊनमध्ये असल्याची माहिती समोर येत असल्याने अशा गोडाऊनची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, शासनाकडून तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार येणारा खतसाठा इतरत्र वळवला जाऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली....
चिंचगव्हाण येथे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांची जनगणना कामाची पाहणी

चिंचगव्हाण येथे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांची जनगणना कामाची पाहणी

राजकारण
अचूक व पारदर्शक जनगणना ही विकासाच्या नियोजनाचा पाया; नागरिकांना सहकार्याचे आवाहन हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| भारत सरकारच्या वतीने सुरू असलेल्या घरयादी व घरगणना कार्याची पाहणी करण्यासाठी आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांनी चिंचगव्हाण गावाला भेट देत जनगणना प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी गावात सुरू असलेल्या जनगणना कामाची माहिती त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी आमदार कदम-कोहळीकर यांनी जनगणना प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह जनगणना ही शासनाच्या विकास आराखड्याचा पाया असते. गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.” तसेच, शासनाच्या विविध योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, र...
तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| विदर्भ-मराठवाडा -तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर तालुक्याच्या बोरगडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन पर्वानिमित्त आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बोरगडी येथील हनुमान मंदिरात उपस्थित होऊन मारोतीरायाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे परमभक्त आणि शक्ती-युक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मतदार संघातील सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.   यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. मंदिर कमेटीच्या वतीने आमदारांचा स्वागत व सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महत्त्वप...
भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

आरोग्य, राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील बरडशेवाळा येथे हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ व ‘पोले इंडोव्हॅस्क्युलर केअर, संभाजीनगर’चे संचालक डॉ. शिवाजीराव पोले यांनी आपल्या जन्मभूमीत हे शिबिर आयोजित केले. हभप मधुकर खोडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त हभप रामेश्वर खोडे महाराज (ईसापुरकर) यांच्या वाणीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान रविवारी (दि. 29 मार्च) या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश मस्के, दंतरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी मस्के यांच्यासह नांदेड येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. त्यामध्ये डॉ. बालाजी नाईक (मधुमेह, थायरॉईड व हार्मोन तज्ज्ञ), डॉ. सूरज जाधव (न्यूरो सर्जन), डॉ. विठ्ठल फड (जनरल फिजिशियन), डॉ. उमेश कानडे (...
error: Content is protected !!