Tag: नांदेड

भोकर पोलिसांची गुटखा माफियावर मोठी कारवाई; ₹1,07,550 चा मुद्देमाल जप्त

भोकर पोलिसांची गुटखा माफियावर मोठी कारवाई; ₹1,07,550 चा मुद्देमाल जप्त

क्राइम
भोकर/ नांदेड| अवैध गुटखा विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹1,07,550 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता बटाळा चौक ते म्हैसा बायपास रोड परिसरात, डॉक्टर एकाळे यांच्या शेताजवळ काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी आमेर खान मुझफर खान (वय ३१, रा. खुदवाईनगर, देगलूर नाका, नांदेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिरोजा पान मसाला (२६० पाकिटे – ₹३१,२००), AAA गुटखा (१६५ पाकिटे – ₹३१,३५०) तसेच स्प्लेंडर मोटारसायकल (MH26-BB-8320 – ₹४५,०००) असा एकूण ₹१,०७,५५० किमतीचा मुद्देमाल ज...
इंस्टाग्रामवर खंजर दाखवून दहशत माजवणाऱ्यांना अटक; 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

इंस्टाग्रामवर खंजर दाखवून दहशत माजवणाऱ्यांना अटक; 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | सोशल मीडियावर खंजरासह फोटो पोस्ट करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ₹50,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार सोशल मीडियावर अवैध हत्यारांचे प्रदर्शन करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामवर खंजरासह फोटो पोस्ट करून “302” असा मजकूर टाकत दहशत निर्माण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी नवीन कोठा, नांदेड परिसरातील दोघांना पोलिसांनी एक खंजर, दोन मोबाईल फोन, स्प्लेंडर मोटारसायकल, एकूण किंमत : ₹50,500 मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपीकडील मोटारसायकल ही चोरीची असल्याचे समोर आले. यासंदर्भात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आधीच गु.र.नं. 286/2026 (कलम 303(2) भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हा दाखल ह...
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ८ एप्रिलपासून सर्वेक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ८ एप्रिलपासून सर्वेक्षण

सामाजिक
नांदेड| खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राज्यभर व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात हे सर्वेक्षण ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या स्वायत्त संस्थेमार्फत अशा खुल्या प्रवर्गातील जाती-घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात, ज्यांना इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. युवक-युवतींसह सर्व वयोगटातील लाभार्थ्यांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. या सर्वेक्षणात सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा २५ जातींचा समावेश करण्यात आला आह...
एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

क्राइम
धर्माबाद/निझामाबाद | क्रिकेट सट्टा प्रकरणात मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला अखेर धर्माबाद व निझामाबाद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरण निझामाबाद येथील 5th Town पोलीस ठाण्यात गु.र.नं. 66/2025 अंतर्गत दाखल असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 61(2), 316(2), 111 तसेच आयटी अॅक्ट 66-D, 69(A) व सह ३, ४ तेलंगणा जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ दरम्यान क्रिकेट सट्टा चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याचवेळी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर (पो.स्टे. धर्माबाद) यांना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी मनोज मानधनी हा धर्माबाद येथे आला आहे. त्यानुसार निझामाबादच्या North Rural CI यांच्या पथकासोबत संयुक्त सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला अ...
होमगार्डच्या सतर्कतेमुळे पाच महिन्यांनी वडील-मुलाची भावनिक भेट

होमगार्डच्या सतर्कतेमुळे पाच महिन्यांनी वडील-मुलाची भावनिक भेट

सामाजिक
लोहा| घरातून निघून गेलेल्या वृद्ध पित्याची तब्बल पाच महिन्यांनंतर मुलासोबत पुनर्भेट घडवून आणण्याची हृदयस्पर्शी घटना लोहा बसस्थानकात घडली. होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांच्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले. हिंगोली जिल्ह्यातील खानापूर येथील मारुती तुकाराम पवार पाटील हे वृद्ध व्यक्ती काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेले होते. मुलांनी शेती विकल्याची खंत मनात ठेवून त्यांनी घर सोडले होते. पंढरपूरला जात असल्याचे सांगून ते निघाले आणि त्यानंतर तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी फिरत राहिले. गेल्या पाच महिन्यांपासून ते भटकंती करत होते. दरम्यान, ते लोहा बसस्थानकात अत्यंत अशक्त अवस्थेत, मळक्या कपड्यांमध्ये एका कोपऱ्यात झोपलेले आढळले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या या वृद्धाला त्यांनी प्रथम अन्न व पाणी देऊन आधार दिला....
ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

क्राइम
नांदेड| शहरातील चोरी व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 ते 7 एप्रिल पहाटे 2 वाजेपर्यंत हे ऑपरेशन पार पडले. या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. नांदेड ग्रामीण , इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ यांसह कुंटूर, रामतीर्थ, सोनखेड, उस्माननगर, लिंबगाव आदी ठाण्यांनी संयुक्त कारवाई केली. ऑपरेशनदरम्यान सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपी, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अनेक संशयितांची चौकशी करून काह...
गोदावरी नदी पुनरुज्जीवनासाठी नांदेड जिल्हा प्रशासनासोबत सामंजस्य करार

गोदावरी नदी पुनरुज्जीवनासाठी नांदेड जिल्हा प्रशासनासोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र
नांदेड| गोदावरी नदी खोऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत डियाजियो इंडिया आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संतुलन साधण्यास मोठी मदत होणार आहे. हा करार नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि डियाजियो इंडिया (नांदेड) चे मॅच्युरेशन अँड डिस्टिलेशन विभागाचे महाव्यवस्थापक प्रकाश वामनराव बोडाडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या भागीदारीअंतर्गत डियाजियो इंडिया कडून पाणी पुनर्भरण (Water Recharge) तसेच WASH (पाणी, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी) यांसंबंधित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालय जलस्रोतांची निवड, शासकीय योजनांशी समन्वय आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “गोदावरी नदी चे पुनरुज्जीवन हे ...
भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

राजकारण
नांदेड| भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त सोमवार, ६ एप्रिल रोजी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यालयात उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. गांधी पुतळ्याजवळील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख तसेच महापौर कविताताई मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक “वंदे मातरम्” गीताने झाली. या प्रसंगी डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटनही अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्थापना दिनानिमित्त कार्यालयाची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित कार्यकर्त...
नांदेडची शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा – रविकांत गायकवाड

नांदेडची शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा – रविकांत गायकवाड

क्राइम
नांदेड| जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत गायकवाड यांनी गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, गेल्या तीन दिवसांत नांदेड शहरात पाच खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड शहरातील ई-स्क्वेअर परिसरातील तिहेरी खून, विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात झालेला खून, तसेच मुरमुरा मार्केट आणि श्रीनगर भागातील सलग घटना या अत्यंत धक्कादायक असून, या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागर...
नांदेडमध्ये “कायापालट” उपक्रमाचा मानवतेचा स्पर्श

नांदेडमध्ये “कायापालट” उपक्रमाचा मानवतेचा स्पर्श

सामाजिक
नांदेड| शहरात उपेक्षित, निराधार आणि मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देणारा “कायापालट” उपक्रम एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी ७४ व्या महिन्यातही अत्यंत तळमळीने पार पडला. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून यावेळी ४७ भ्रमिष्ट व्यक्तींना स्वच्छतेसह सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या ७४ महिन्यांत ३७०० हून अधिक बेघर, भिकारी आणि मानसिक आजारग्रस्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा हा उपक्रम आता नांदेडच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे. या उपक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्र...
error: Content is protected !!